महानायकानं सांगितलं 'जलसा'चं गुपित; कित्येकांनी लावली होती बोली

bollywood big b amitabh bachchan shared a throwback photo and told the history of jalsa
bollywood big b amitabh bachchan shared a throwback photo and told the history of jalsa

मुंबई - बॉलीवूडचे बिग बी महानायक म्हणून प्रसिध्द असणारे अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे सेलिब्रेटी आहेत. सर्वात व्यस्त आणि मानधन घेणारे कलावंत म्हणूनही अमिताभ यांचे नाव आघाडीवर आहे. सोशल मीडियावर ते सध्या वेगवेगळया प्रकारचे पोस्ट टाकून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या सर्वात लोकप्रिय अशा कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात यापुढे काम न करण्याचा निर्णय घेतला होता. दोन दशकांहून अधिक काळ एखादा शो होस्ट करणं आणि त्याची लोकप्रियता टिकवून ठेवणं हे अमिताभ यांना शक्य झाले आहे. त्यांच्यापूर्वीही अनेकांनी हा शो होस्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यात शाहरुख खानचे नाव घ्यावे लागेल. मात्र त्यालाही अमिताभ यांच्याइतकं यश संपादन करता आलं नाही. आता अमिताभ हे चर्चेत आले आहेत ते त्यांच्या प्रसिध्द जलशा बंगल्यामुळे.

अमिताभ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी आपल्या घराविषयी म्हणजे जलशा बंगल्याविषयीच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. जलशा बंगल्याचा इतिहास, तसेच त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या आठवणींना अमिताभ यांनी सोशल मीडियावर शब्दबध्द केले आहे. मला हे घर कसं मिळालं याविषय़ी त्यांनी लिहिलं आहे. यावेळी अमिताभ यांनी जया बच्चन यांच्याबरोबर एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी सांगितले आहे की, या बंगल्यामध्ये आतापर्यत वेगवेगळ्या चित्रपटांच्या शुटिंग झाल्या आहेत. नुसतीच शुटिंग नाही तर ते सर्व चित्रपट हिटही झाले आहेत.

अमिताभ यांनी सांगितले, ऋषिकेश मुखर्जी यांच्याबरोबर केलेल्या चुपके चुपके या चित्रपटाला आज 46 वर्षे झाली आहेत. मी शेअर केलेल्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की त्यात निर्माते रमेश सिप्पीही आहेत. आम्ही त्यावेळी हे घर खरेदी केले. ते विकले. नंतर पुन्हा खरेदी केले. पुन्हा त्याची डागडुजीही केली. आता हे आमचे घर आहे ज्याचे नाव जलसा असे आहे. याठिकाणी वेगवेगळ्या चित्रपटांची शुटिंग झाली आहे. काही नावं सांगायची झाल्यास आनंद, नमकहराम, चुपके चुपके आणि सत्ते पे सत्ता ही नावं तुम्हाला माहीती असायला हवीत. यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

अमिताभ आता इमरान हाश्मी याच्यासोबत चेहरे नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. कोरोनामुळे या चित्रपटाची शुटिंग पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या मनोरंजन क्षेत्राला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. अनेक सेलिब्रेटींना कोरोना झाला असून ते घरी क्वॉरंनटाईन आहेत. यापुढील काळात अमिताभ हे गुडबाय नावाच्या चित्रपटातही दिसणार आहेत. त्यात त्यांच्या पत्नीची भूमिका प्रसिध्द अभिनेत्री नीना गुप्ता करणार आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com