FIFA WC22: फिफाच्या फायनलमध्ये बॉलिवूडकरांची जत्रा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIFA WC22

FIFA WC22: फिफाच्या फायनलमध्ये बॉलिवूडकरांची जत्रा...

गेल्या काही दिवसांपासून फिफा वर्ल्डची चर्चा आहे. कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा फुटबॉलचा थरार अंतिम फेरीत पोहोचला आहे. अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. लाखो लोक एकत्र बसून कतारच्या स्टेडियममध्ये हा सामना पाहतलच त्याचबरोबर जगभरात लाखो लोक हा सामना पाहतील.

विशेष म्हणजे या ऐतिहासिक सामना पहाण्यासाठी अनेक सिनेतारकही हजेरी लावणार आहेत. त्यापैकी पहिलं नाव बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचं आहे. वास्तविक शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण अंतिम सामन्यादरम्यान त्यांच्या पठाण चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसणार आहेत. यासोबतच ते या स्पर्धेचा आनंदही घेणार आहे.

हेही वाचा: Besharam Rang: भगव्या बिकीनीचा वाद आता थेट किंमतीवर; ट्रोल करणाऱ्यांना मिळाला नवा मुद्दा...

त्याचबरोबर कार्तिक आर्यनही फुटबॉल सामना पाहणार आहे. इंस्टाग्रामवर ही माहिती देताना त्यानं लिहिले आहे की फुटबॉल म्हणजे पॅशन. कतारला जातानाचा एक फोटोही त्यांनी शेअर केला आहे. त्यांच्याशिवाय फराह खानही या सामन्याचा आनंद घेणार आहे. फराह सध्या हा कतारमध्येच आहे. त्याने कार्तिकच्या पोस्टवर ‘आजा’ अशी कमेंटही केली आहे. फराहने तिसऱ्या क्रमांकासाठी मोरोक्को आणि क्रोएशिया यांच्यातील सामनाही पाहिला आहे.

हेही वाचा: FIFA WC22: 165 कोटींची किंमत; तरी वर्ल्डकप विजेत्याला मिळणार खोटी ट्रॉफी!

त्याचबरोबर नोरा फतेही आज फायनलच्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये परफॉर्म करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. याआधी नोराने फिफा वर्ल्ड कपच्या फॅन फेस्टमध्ये परफॉर्म केले होते. त्याचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. याआधी अनेक फिल्म स्टार्स सेमीफायनल मॅच पाहण्यासाठी कतारला गेले होते. यामध्ये अनन्या पांडे, संजय कपूर, करिश्मा कपूर, आदित्य रॉय कपूर, चंकी पांडे आणि शनाया कपूर यांसारख्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे.