esakal | बॉलीवूड सेलिब्रेटींना आलं रडू, पोस्ट व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

बॉलीवूड सेलिब्रेटींना आलं रडू, पोस्ट व्हायरल

बॉलीवूड सेलिब्रेटींना आलं रडू, पोस्ट व्हायरल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - वयाच्या अवघ्या चाळीशीमध्ये अखेरचा श्वास घेणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्यानं बॉलीवू़डवर शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गज सेलिब्रेटींनी त्याला श्रद्धांजलीही वाहिली आहे. हद्यविकाराच्या धक्क्यानं सिद्धार्थचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर बऱ्याच वेळानं वैद्यकीय अहवालातून त्याच्या शरीरावर इतर कोणत्याही जखमा नसल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे गेल्या काही तासांपासून त्याच्या मृत्युविषयी जे सांगण्यात आले होते ती माहिती वैदयकीय अहवालानं चूकीची ठरवली आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हायप्रोटीनचं सेवन, अतिरिक्त कसरत याचाही फटका त्याच्या प्रकृतीवर झाल्याचे सांगण्यात आले आहे.

त्याचं जाणं हे मनोरंजन क्षेत्रालाही चटका लावून जाणारं आहे. त्याच्या निधनानंतर बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी त्याला आदरांजली वाहिली आहे. बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यानं शुक्लाला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याच्याबरोबरच कबीर सिंगमध्ये अभिनय केलेल्या अभिनेत्री निकिता दत्तनं लिहिलं आहे की, सिद्धार्थच्या बातमीनं मन हेलावून गेलं आहे. माझ्यासाठी ही अतिशय वाईट गोष्ट आहे.

loading image
go to top