स्टार फुटबॉलपटू मॅरेडोना यांच्या निधनामुळे बॉलिवूडही शोकाकुल

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 26 November 2020

मॅरेडोना यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये देखील शोकाकुल वातावरण आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं दुख: व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुंबई-  अर्जेंटिनाचेप्रसिद्ध माजी फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं निधन झालं आहे. ते ६० वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. जबरदस्त खेळाच्या जोरावर फुटबॉल क्षेत्रात दबदबा निर्माण करणाऱ्या मॅरेडोना यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये देखील शोकाकुल वातावरण आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं दुख: व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हे ही वाचा: बॉबी देओल म्हणाला, ''अशी कल्पनाही केली नव्हती''  

अभिनेत्री करिश्मा कपूरने लिहिलंय, या दिग्गजाला भेटल्याचा अभिमान आहे. तर शाहरुखने म्हटलंय, तुम्ही फुटबॉलला आणखी सुंदर बनवलं. आम्हाला तुमची खूप आठवण येईल. श्रद्धांजली. अभिनेता अजय देवगणने लिहिलंय की, कित्येक वर्षांपासून त्यांना आणि त्यांच्या फुटबॉलला फॉलो करतोय. तुम्ही मला खेळाच्या जवळ आणलंत. ते फुटबॉलमधील दिग्गज आणि सच्चे स्पोर्ट्समन होते. श्रद्धांजली. यासोबतंच अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे खास फोटो आणि काही खास आठवणी सोशल मिडियावर शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KK (@therealkarismakapoor)

 

 

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला मॅरेडोना यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. घरी उपचार घेत असतानाच, बुधवारी त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका बसला. डॉक्टरांचे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मॅराडोना यांच्या निधनाच्या बातमीने बुधवारी सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. अर्जेटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बेटरे फर्नाडेझ यांनी तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला.

bollywood celebs say goodbye to star football icon diego maradona see their messages  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood celebs say goodbye to star football icon diego maradona see their messages