सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, अंकिता आणि बहीण श्वेतासोबतंच बॉलीवूडमधील कोणकोणत्या कलाकारांनी दिल्या प्रतिक्रिया? वाचा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 19 August 2020

सुशांत सिंह प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे हा तपास सोपवला आहे. यावर आता बॉलीवूडमधून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

मुंबई- सुशांत सिंह प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे हा तपास सोपवला आहे. यावर आता बॉलीवूडमधून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सुरुवातीपासूनंच सुशांत प्रकरणात खुलेआमपणे बोलणारी अभिनेत्री कंगना रनौट, सुशांतसाठी सतत सीबीआयची मागणी करणारी अंकिता लोखंंडे आणि अभिनेता अक्षय कुमार यांनी सुप्रीम कोर्टाच्या या ऐतिहासिक निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. 

हे ही वाचा: सलमान खानच्या हत्येचा कट रचणा-या आरोपीला अटक, मुंबईत येऊन रेकी देखील केली होती...  

सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून सीबीआय तपासाला हिरवा झेंडा मिळाल्यानंतर कंगना रनौटने देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. तिने ट्विट करुन लिहिलंय, माणुसकीचा विजय, प्रत्येक सुशांत योद्ध्याला शुभेच्छा. मी पहिल्यांदा अशी शक्तिशाली एकजुट  पाहिली आहे. खूपंच छान. सीबीआय आता हे प्रकरण सांभाळेल. 

सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती सुशांतसाठी सतत सीबीआयची विनंती करत होती. त्यामुळे या निर्णयानंतर आता श्वेताने प्रतिक्रिया देत म्हटलंय, 'सुशांतसाठी सीबीआय' म्हणत तिने आनंद व्यक्त केला आहे.

यासोबतंच श्वेताला तिच्या प्रत्येक मोहिमेत पाठिंबा देणारी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिच्या प्रतिक्रियेची देखील चाहते वाट पाहत होते. अंकिताने ट्विट करत म्हटलं आहे,'न्याय हे कृतीमधील सत्य आहे, सत्याचा विजय होतो.'

तर अभिनेता अक्षय कुमारने पहिल्यांदाच सुशांत प्रकरणात ट्विट करत म्हटलंय, 'सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यु प्रकरणात सीबीआयला तपास करण्याचे आदेश दिले आहेत. आता सत्य समोर येईल' . याव्यतिरिक्त अशोक पंडित यांनी म्हटलंय, 'रिया चक्रवर्तीची मागणी होती की सुशांत प्रकरणात सीबीआय तपास व्हावा. ज्यासाठी तिने अमित शहा यांना देखील टॅग केलं होतं. सुप्रीम कोर्टाने ही गोष्ट मान्य केली आहे. आता या खेळात मजा येईल.'

अभिनेता निल नितीन मुकेशने म्हटलंय, 'न्याय मिळतोच. देव महान आहे.' तर नेहमीच स्वतःच्या बेताल वक्तव्यांसाठी चर्चेत असलेल्या कमाल रशिद खान म्हणजेच केआरकेने या प्रकरणात प्रतिक्रिया देताना म्हटलंय, 'मला हे बोलताना अत्यंत दुःख होतंय की सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरण हाताळण्यात मुंबई पोलिसांनी स्वतःची पद्धत वापरुन स्वतःच्या त्यांची प्रतिमा खराब केली आहे. मी नेहमीच मान्य केलं आहे की मुंबई पोलिस सर्वश्रेष्ठ पोलिस आहेत. मात्र मुंबई पोलिसांनी या प्रकरणात यूपी बिहारच्या पोलिसांसोबत खूपंच वाईट वर्तन केलं आहे.'    

bollywood celebs on sushant singh rajput suicide case supreme court decision cbi  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood celebs on sushant singh rajput suicide case supreme court decision cbi