सलमान खानच्या हत्येचा कट रचणा-या आरोपीला अटक, मुंबईत येऊन केली होती रेकी

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 19 August 2020

सलमान खानवर अनेकदा हल्ला करणार असल्याच्या धमक्या  याआधी ऐकल्या आहेत मात्र यावेळी चक्क सलमानच्या हत्येचा कटंच रचला जात होता.

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक पण दिलासा देणारी बातमी आहे. अभिनेता सलमान खानवर अनेकदा हल्ला करणार असल्याच्या धमक्या  याआधी ऐकल्या आहेत मात्र यावेळी चक्क सलमानच्या हत्येचा कटंच रचला जात होता. मात्र दिलासा देणारी बातमी अशी की सलमान खानच्या हत्येचा कट रचणा-या या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

हे ही वाचा: रिया चक्रवर्तीच्या लीगल टीमचं नवीन स्टेटमेंट, सुशांतच्या बहीणीवर केले अनेक आरोप

राहुल उर्फ सांगा उर्फ बाबाने यावर्षीच्या जानेवारी महिन्यात सलमान खानची रेकी देखील केली होती.  हा आरोपी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसाठी काम करत असल्याचं कळतंय. यासोबतंच त्याच्यावर गंभीर आरोप देखील आहेत. २४ जून रोजी फरिदाबादमध्ये रेशन डीलर प्रवीणच्या हत्येचा मुख्य आरोपी राहुलंच आहे. मुंबईतील बांद्रा येथे असलेल्या सलमानच्या घराची त्याने रेकी देखील केली होती. त्याने दोन दिवस मुंबईमध्ये मुक्काम देखील केला होता. या दरम्यान सलमानच्या घराबाहेर येणा जाणा-यांवर तो नजर ठेवून होता. 

पोलिसांनी १५ ऑगस्ट रोजी उत्तराखंड मधील पौडी गढवालमधून त्याला अटक केली होती. तसंच चार दिवस त्यालो पोलिस रिमांडमध्ये पाठवण्यात आलं होतं. मंगळवारी त्याला रिमांडचा काळ पूर्ण झाल्यावर पोलिसांनी त्याला कोर्टात सादर केलं. जिथून त्याला न्यायालयीन कोठडीत नीमका जेलमध्ये पाठवण्यात आलं. मुख्य डीसीपी राजेश दुग्गल यांनी या प्रकरणात मंगळवारी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली की 'राहुल उर्फ सांगा अतिशय चालाख आहे. त्याने कुख्यात गँगस्टर लॉरेंस बिश्नोई आणि संपत नेहरा यांच्या सांगण्यावरुन जानेवारी २०२० मध्ये मुंबईत येऊन सलमान खानची रेकी केली होती. या रेकीबद्दलची माहिती त्याने राजस्थानच्या जेलमध्ये बंद असलेल्या लॉरेंस बिश्नोईला दिली होती.'

राजस्थानमध्ये काळवीट शिकार प्रकरणामुळे लॉरेन्स बिश्नोई आणि संपत नेहराने राहुलकडून मुंबईत सलमान खानची रेकी करुन घेतली होती. तो मुंबईतून परतल्यावर लगेचच लॉकडाऊन सुरु झालं. त्यामुळे तो त्याच्या प्लानमध्ये यशस्वी होऊ शकला नाही. पोलिसांना जेव्हा याविषयी माहिती मिळाली तेव्हा त्यांनी सलमान खानची सुरक्षा वाढवली. 

सलमान खान लॉकडाऊनमध्ये त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवरंच होता. तर काही दिवसांपूर्वीच तो 'बिग बॉस'च्या प्रोमो शूटसाठी मुंबईतील एका स्टुडियाच्या बाहेर दिसून आला होता.  

salman khan murder planner arrest from uttrakhand


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salman khan murder planner arrest from uttrakhand