Ganesh Acharya News| प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Acharya News, Ganesh Acharya Latest News updates

प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यावर गुन्हा दाखल

Entertainment News: बॉलीवूडच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यवर (Bollywood Choreographer Ganesh Acharya) महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पीडितेचा पाठलाग करणे, तिच्यावर नजर ठेवणे (Bollywood News) अशा प्रकारचे आरोप त्याच्यावर करण्यात आले आहे. मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यामध्ये गणेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bollywood Movies) याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पीडितनं त्याच्यावर केलेले आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. (Ganesh Acharya News)

बॉलीवूडमध्ये कायमच आपल्या हटके स्टाईलमुळे गणेश आचार्य हा लोकप्रिय. राहिला आहे. आजवर त्यानं वेगवेगळ्या गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन करुन चाहत्यांची दाद मिळवली आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यानं बॉलीवूडमध्ये काम केलं आहे. आता त्याच्यावर एका पीडीतेनं लैंगिक छळाचा आरोप केला असून आपल्यावर देखरेख करणे, पाठलाग करण्याचे आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात गणेशच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणेशवर कलम 354, 354 सी, 509, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे अजुनपर्यत गणेशकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही.

हेही वाचा: Most Expensive Outfits Worn by Bollywood Actresses : हि अभिनेत्री बनली लेडी लेपर्ड | Sakal Media |

त्याच्यावर आरोप केलेली पीडिता ही त्याची कोरिओग्राफर सहकारी असून तिनं याप्रकरणी 2020 मध्ये केलेल्या तक्रारीमध्ये सांगितलं होतं की, ती गणेशच्या ऑफिसमध्ये कामासाठी जात असे. त्यावेळी त्यानं तिच्यावर काही शाररिक टिप्पणी केल्या होत्या. केवळ शेरेबाजीच नाहीतर अश्लील व्हिडिओ दाखवले जात होते. त्यानं केलेल्या मागणीला धुडकावल्यानंतर त्यानं मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली होती. एवढेच नाहीतर सहा महिन्यानंतर भारतीय फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोशिएशननं तिची सदस्यता रद्द केली होती.

Web Title: Bollywood Choreographer Ganesh Acharya Charged Harassment Fir Registered

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top