esakal | नोराचा 'साकी साकी' वर वंटास डान्स; फॅन्स घायाळ

बोलून बातमी शोधा

bollywood dancer nora fatehi and tusshar kalia dance on saki saki video viral
नोराचा 'साकी साकी' वर वंटास डान्स; फॅन्स घायाळ
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द डान्सर म्हणून नोरा फतेहीचं नाव घ्यावं लागेल. अल्पावधीतच तिनं आपल्या नृत्यानं भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करण्यास सुरुवात केली आहे. तिला प्रकाश झोतात आली ते तिच्या साकी साकी गाण्यावरील डान्समुळे. त्यामुळे तिच्या डान्सचा सगळीकडे बोलबाला झाला. नोराला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियताही मिळाली. सध्या तिच्याकडे चित्रपट नसले तरी ती वेगवेगळ्या डान्स शो मध्ये सेलिब्रेटी गेस्ट, जज म्हणून दिसते. सोशल मीडियावर तिच्या डान्सचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. आताही तिच्या साकी साकी गाण्यावरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याला फॅन्सचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे.

डान्स दिवानेच्या सेटवर नोरानं तुषार कालियासोबत साकी साकीच्या गाण्यावर डान्स केलायं. तुषार हा कोरिओग्राफर म्हणून प्रसिध्द आहे. त्या दोघांचा डान्स मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नोराच्या डान्सचे चाहते मोठे आहेत. सोशल मीडियावर तिला फॅन फॉलोअर्सही प्रचंड आहे. ज्यावेळी तिच्या नव्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा तिला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट दिल्या आहेत. तुषार आणि नोरा मधील केमिस्ट्रीही जबरदस्त असल्याचे दिसून आले आहे.

नोराच्या त्या व्हिडिओला आतारपर्यत 70 हजारांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये नोरानं ऑरेंज कलरचा ड्रेस परिधान केला असून तिचा लूक कमालीचा सुंदर दिसतो आहे. त्या दोघांच्या डान्स बरोबरच त्यांच्यातील केमिस्ट्रीही जबरदस्त असल्याचे दिसून आले आहे. फॅन्सनं केवळ नोराचच नाही तर तुषारचेही कौतूक केलं आहे. नोरा आणि तुषारचा व्हिडिओ नोरानं इंस्टावर शेअर केला आहे. तिनं त्या व्हिडिओला कॅप्शनही दिली आहे. तिनं लिहिलं आहे, काय होईल जेव्हा पाण्याचा जोरदार प्रवाह आणि दुसरीकडे आग यांचे कॉम्बिनेशन एकत्रपणे पाहायला मिळेल, पाहा डान्स दिवानेच्या सेटवर