esakal | तुला वाटलं कसं कळेल?, विक्रमचं दुसरं लग्न महेश भट्ट यांची पोलखोल
sakal

बोलून बातमी शोधा

तुला वाटलं कसं कळेल?, विक्रमचं दुसरं लग्न  महेश भट्ट यांची पोलखोल

तुला वाटलं कसं कळेल?, विक्रमचं दुसरं लग्न महेश भट्ट यांची पोलखोल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील एक नवं नातं सध्या समोर आले आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. मात्र त्याचा खुलासा आतापर्यत समोर आला नव्हता. त्या प्रसिद्ध निर्मात्याचं नाव आहे विक्रम भट्ट. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचं आणि श्वेतांबरी सोनीचं नाव चर्चेत होतं. आता त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी गुपचूप दुसरं लग्न केलं आहे. त्याच्या दुसऱ्या पत्नीचं नाव श्वेतांबरी सोनी असं आहे. त्यांच्या या लग्नाविषयी फारसं कुणाला माहिती नव्हतं. त्यांच्या या लग्नावर दिग्दर्शक महेश भट्ट य़ांनी दिलेली प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

विक्रम भट्ट हे 52 वर्षाचे आहे. इ टाईम्सनं दिलेल्या एका वृत्तानुसार त्यांनी आता दुसरं लग्न केलं आहे. त्यांनी श्वेतांबरी सोनीशी लग्न केलं आहे. ज्यांनी तिला लपवून ठेवलं होतं. अशी चर्चा आहे. आपण कोरोनाच्या काळात लग्न केलं. त्यामुळे या लग्नाविषयी फारसं कुणाला माहिती नाही. अशाप्रकारे विक्रम यांनी सारवासारव केली आहे. यापूर्वी विक्रम यांनी आदिती भट्टशी लग्न केलं होतं. त्यानंतर त्याचा घटस्फोट झाला होता. आता त्या विक्रम भट्ट यांच्या लग्नाविषयीची माहिती समोर आली आहे त्यावर महेश भट्ट यांनी खुलासा केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे की, महेश भट्ट यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लग्न केले.

विक्रमनं आपल्याला फोन करुन लग्नासंबंधी विचारणा केली होती. त्यानं आपल्याला कल्पनाही दिली. मी लग्न करत आहे. कोरोनाच्या काळात मला फारसं कुणाला सांगता आलं नाही, त्यामुळे कोविडच्या वेळी अनेक गोष्टींची काळजी घेऊन आरोग्यासंबंधी विचार करुन मी कुणाला बोलवू शकलो नाही. मला तुमच्यावर कोणताही भार टाकायचा नाही. मात्र यासगळ्या बंधनातून मी आता मुक्त होतो आहे. विक्रमला मी सांगितलं की, तु एखाद्या मांजरीसारखा आहे. तु डोळे मिटून दूध पित होता. तुला वाटलं कुणाला काही माहिती होणार नाही. मात्र तसे झाले नाही. तुझं लग्न काही केल्या लपून राहणार नव्हतं. श्वेतांबरी सोनी मुंबईतील ट्रिनीटी आर्ट गॅलरीशी जोडली गेली आहे. महेश भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम भटवर तिचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला आहे.

loading image
go to top