उपचारासाठी फिजिओथेरपिस्टकडे गेला,तिच्या प्रेमात पडला; गोष्ट प्रभुदेवाची

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 20 November 2020

प्रभूदेवाने 1995 मध्ये रामलतासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र, नयनतारामुळे या दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

मुंबई - कोणाचं कुणावर कधी प्रेम बसेल हे खुद्द ब्रम्हदेवालाही सांगता येणार नाही. काहीवेळा अपघातानं आयुष्यात येणा-या व्यक्ती पुढील आयुष्यासाठी सहप्रवासी होतील याचीही कुणाला कल्पना नसते. बॉलीवूडमधील प्रसिध्द डान्सर आणि दिग्दर्शक प्रभुदेवा हा कायम चर्चेत असणारा कलाकार आहे. तो आता त्याच्या फिजिओथेरपिस्टसोबत करणार लग्न करणार आहे.

प्रभुदेवा हा त्याच्या भाचीसोबत लग्न करणार असल्याची चर्चा होती. मात्र आता तो उपचार घेण्याकरिता ज्या फिजिओथेरिपिस्टकडे गेला होता तिच्या प्रेमात पडल्याचे दिसून आले आहे. प्रभूदेवा  पुन्हा एकदा लग्नाची बेडीत अडकणार असल्याचं ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तो  त्याच्या भाचीसोबत लग्न करणार असल्याची चर्चा होती. या अफवा असून प्रभूदेवा मुंबईतील एका फिजीओथेरपिस्टसोबत लग्न करणार आहे.

 

सप्टेंबरमध्ये ही जोडी लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. प्रभूदेवाने 1995 मध्ये रामलतासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र, यनतारामुळे या दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अमिताभ यांच्याकडे नाहीये एकही ATM कार्ड, स्वतः केला खुलासा

2011मध्ये प्रभूदेवा आणि रामलता यांनी कायदेशीरित्या घटस्फोट घेतला.बॉलीवूडमधील प्रख्यात डान्सर म्हणून प्रभुदेवाचे नाव घ्यावे लागेल. त्याचा फॅनफॉलोअर्सही मोठा आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्याचे चाहते पसरले आहे. तो फक्त नृत्यदिग्दर्शक म्हणून त्याची ओळख नाही तर त्यानं दिग्दर्शन आणि अभिनयातही आपला ठसा उमटविला आहे.

हे ही वाचा: शाहरुखच्या घरात एक रात्र राहण्याची जबरदस्त संधी, इथे करा अर्ज आणि...  

पाठीला दुखापत झाल्यामुळे प्रभूदेवा या फिजीओथेरपीस्टकडे उपचार घेत होता. त्याच काळात या दोघांचं सूत जुळलं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या रिलेशनपूर्वी प्रभूदेवा आणि त्याच्या भाचीच्या  प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. 
 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bollywood famous chorographer prabhudeva marry to his physiotherapist