अमिताभ यांच्याकडे नाहीये एकही ATM कार्ड, स्वतः केला खुलासा

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 20 November 2020

महाराष्ट्रातुन आलेल्या लक्ष्मी यांनी छान गेम खेळून केबीसीमध्ये १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. इतकंच नाही तर त्यांनी शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांच्याशी खूप मजेशीर गप्पा मारल्या

मुंबई-  नुकताच प्रदर्शित झालेला 'केबीसी १२' चा एपिसोड खूपंच इंट्रेस्टिंग राहिला. महाराष्ट्रातुन आलेल्या लक्ष्मी यांनी छान गेम खेळून केबीसीमध्ये १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. इतकंच नाही तर त्यांनी शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांच्याशी खूप मजेशीर गप्पा मारल्या, लक्ष्मी यांनी सांगितलं की त्या सरकारी शाळेत प्युन म्हणून काम काम करत आहेत. त्यांना शिक्षिका बनायचं होतं मात्र योग्य शिक्षण घेऊ न शकल्याने त्या शिक्षिका बनू शकल्या नाहीत.   

हे ही वाचा: सलमान खानची कोविड-१९ टेस्ट निगेटीव्ह, सुरु करणार 'बिग बॉस'चं शूटिंग  

अमिताभ बच्चन स्पर्धक लक्ष्मी यांच्या खेळामुळे चांगले इंप्रेस झाले. त्यातंच एका प्रश्ना दरम्यान अमिताभ बच्चनने त्यांच्या एटीएमशी संबंधित एक आश्चर्यचकित करणारा खुलासा केला. अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की त्यांच्याकडे एटीएम कार्ड नाहीये. त्यांना एटीएममध्ये जाऊन मशीनमधून पैसै काढायला खूप भिती वाटते. त्यांनी म्हटलं, 'जर कार्ड हरवलं तर आणि आजुबाजुचे लोक विचार करतात की हे चोरी तर नाही करत आहेत.' 

अमिताभ बच्चन यांची ही गोष्ट ऐकून शोमध्ये हजर असलेले सगळे लोक हसायला लागले. अमिताभ बच्चन यांच्या या गोष्टीने सगळ्यांनाच आश्चर्यचकित करुन सोडलं. मात्र एवढ्या मोठ्या सेलिब्रिटींकडे असणारे पैसे पाहुन एटीएम सोबत ठेवणं ही रिस्कंच आहे. यासोबत सेलिब्रिटी अनेकदा चाहत्यांच्या गराड्यात असतात तेव्हा बिग बी यांची ही भिती अगदी बरोबर असल्याचं त्यांच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.      

kbc 12 live amitabh bachchan revealed about atm card  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kbc 12 live amitabh bachchan revealed about atm card