esakal | 'भीक नको रे, मला दोन वेळची भाकरी हवी आहे'
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood famous lyricist Santosh Anand said i am not a beggar  have only food for two times

इंडियनं आयडॉलच्या मंचावर जेव्हा ते आले तेव्हा त्यांचे व्यक्तिमत्व जगासमोर आले.

'भीक नको रे, मला दोन वेळची भाकरी हवी आहे'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - एक प्यार का नगमा है, मोजी की रवानी है, जिंदगी और कुछ भी नही तेरी मेरी कहानी है, हे गाणं आठवतयं. शोर या चित्रपटातील गाणे लता मंगेशकर आणि मुकेश यांनी आपल्या स्वरांनी सजवले होते. त्या गीताचे गीतकार संतोष आनंद आज कुठल्या अवस्थेत जगत आहेत याबद्दल कुणाला काही माहिती नाही. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांच्याबद्दल सोशल मीडियामध्ये चर्चा सुरु आहे. प्रसिध्द गायिका नेहा कक्करनं त्यांना 5 लाखांची मदत केली होती.  संतोष आनंद हे भीक मागून आपला उदरनिर्वाह करत असल्याच्या बातम्या जेव्हा स्वत त्यांनी ऐकल्या आणि वाचल्या तेव्हा त्यांना प्रचंड वाईट वाटले.

कोणेएकेकाळी आपल्या गीतांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणा-या संतोष आनंद यांच्याबद्दल कुणाला फारसं काही माहिती नाही. इंडियनं आयडॉलच्या मंचावर जेव्हा ते आले तेव्हा त्यांचे व्यक्तिमत्व जगासमोर आले. मात्र संतोष आनंद यांनी आपल्यावर माध्यमांमध्ये जे बोलले जात आहे ते चूकीचं असल्याचे म्हटले आहे. आपण काही भीक मागून आयुष्य जगत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले मला कुणाची भीक नको आहे फक्त दोन वेळची भाकरी द्या. असे सर्वांना सांगतो आहे.

संतोष आनंद हे गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडच्या बाहेर आहेत. ज्यावेळी संतोष आनंद हे जेव्हा इंडियन आयडॉलच्या सेटवर आले होते तेव्हा त्यांनी आपली संघर्ष गाथा सगळ्यांना ऐकवली होती. त्यानंतर सर्वांच्या डोळ्यात पाणी आले होते. अनेकांनी त्यांच्या संघर्षाला सलाम केला होता. तर गायिका नेहानं त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता. 5 लाख रुपयांची मदत त्यांना केली होती. तर प्रसिध्द संगीतकार विशाल ददलानीनं त्यांनी लिहिलेल्या गीतांना संगीत देण्याचे मान्य केले आहे.

यानंतर संतोष आनंद यांच्या गरीबीवर सुरुवात झाली. सोशल मीडियातून त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्यावर नको त्या कमेंट केल्या आहेत. संतोष आनंद हे भीक मागून आपले दिवस काढत असून त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. अशा प्रकारच्या बातम्या वाचून संतोष आनंद हे कमालीचे दुखावले आहेत. त्यावर त्यांनी लोकांना सांगितले आहे की, मी तुमच्याकडे भीक मागत नसून मला फक्त दोन वेळची भाकरी द्या. अशा प्रकारचे भावनिक आवाहन त्यांनी लोकांना आणि चाहत्यांना केले आहे. 

रजनीकांतचा जावई आहे, थाट तर असणारच

संतोष आनंद म्हणाले, माणसाला केवळ दोन वेळच्य़ा भाकरीची गरज असते. मी आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी आहे. त्यामुळे मी कुणाकडे मदत मागितली नाही. माणसाच्या आयुष्यात प्रेम जास्त महत्वाचे आहे. पैसाच सर्व काही नसते. मी माझ्या आयुष्यात पैसे, मान मरातब यासोबत माणसांचे प्रेमही कमावले. 
 

loading image