esakal | रजनीकांतचा जावई आहे, थाट तर असणारच
sakal

बोलून बातमी शोधा

south actor dhanush pictures that take you inside south superstar dhanush luxurious house in Chennai

धनुषचे पूर्ण नाव वेंकटेश प्रभु कस्तुरी राजा असे आहे. सध्याच्या घडीला साऊथ मुव्ही विश्वात मोठं नाव असणारा धनुष भलत्याच फॉर्मात आहे.

रजनीकांतचा जावई आहे, थाट तर असणारच

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - रजनीकांत, बस्स नाम ही काफी है. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. केवळ भारतातच नाही तर जगात या अभिनेत्याचे चाहते आहेत. ते फक्त भारतीय नाहीत तर परदेशी देखील आहेत. आपल्या आगळ्या वेगळया अभिनयानं तीन दशकांहून अधिक काळ भारतीय प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. रजनीकांतच्या अभिनयाचा वारसा त्याचा जावई पुढे नेताना दिसत आहे. आता रजनीकांतचा जावई म्हटल्यावर त्याचे राहणीमानही तितक्या उंचीचे आहे. जाणून घेऊया त्याच्याबद्दल.

धनुषचे पूर्ण नाव वेंकटेश प्रभु कस्तुरी राजा असे आहे. सध्याच्या घडीला साऊथ मुव्ही विश्वात मोठं नाव असणारा धनुष भलत्याच फॉर्मात आहे. सोशल मीडियावरही त्याचा मोठा फॅन फ़ॉलोअर्स आहे.

आपल्या चाहत्यांना कधीही नाराज न करणारा धनुषनं अनेक हिट चित्रपट दिले आहेत. धनुषच्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

त्याचे घर हे एखाद्या महालापेक्षा कमी नाही. त्याचे घर पाहिल्यावर एकदा का होईना आपण त्या घरी जायला हवे असे वाटल्याशिवाय राहणार नाही. घराच्या वेगवेगळ्या भागात त्यांनी फ्लोरिंग केलं आहे. तसेच धनुषच्या पाठीमागे लाकडी सोफा आणि सोफा सेट दिसत आहे.

त्याच्या घरातील ड्राविंग रुम देखील कमालीचा सुंदर आहे. धनुषच्या पत्नीनंही ब्राऊन कलरचा सोफा सेट ठेवला आहे. तसेच भिंतीवर काही पेंटिंग्स लावले आहेत.

धनुष आणि त्याच्या पत्नीला वाचण्याची फार आवड आहे. त्यांच्या घरात पुस्तकांसाठी खास जागा आहे. ऐश्वर्यानं एक शेअर केला आहे त्यात ती आणि त्यांचा मुलगा वाचत असल्याचे दिसत आहे.

 धनुषच्या घरातून दिसणारा सनसेटचा व्ह्यु एकदम खास आहे. 18 नोव्हेंबर 2004 मध्ये धनुष आणि ऐश्वर्याचे लग्न झाले होते. तमिळ रितीरिवाजानुसार हे लग्न झाले होते. त्यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  
 

loading image