Ram Mandir: अयोध्येतील राममंदिराचा इतिहास येणार मोठ्या पडद्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ram Mandir: अयोध्येतील राममंदिराचा इतिहास येणार मोठ्या पडद्यावर

Ram Mandir: अयोध्येतील राममंदिराचा इतिहास येणार मोठ्या पडद्यावर

७० वर्षांहून जास्त काळ चाललेली कायदेशीर लढाई आणि ४० दिवसांच्या मॅरेथॉन सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१८ अयोध्येतील राममंदिराबाबत निर्णय दिला होता. त्यानंतर अयोध्येतील वादग्रस्त जमिनीवर राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्याचे कामही सुरु आहे.

हेही वाचा: Ayodhaya Ram Mandir : राममंदिराचे काम चाळीस टक्के पूर्ण

आता या सर्व एतिहासिक प्रकरणावर चित्रपटाची निर्मीती करण्यात आली येणार आहे. राम मंदिराचा 500 वर्षांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. याची जबाबदारी प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना देण्यात आली आहे. त्याच्यीसोबत सहा सदस्यांची टीम काम करणार आहे. महत्वाचे म्हणजे राम मंदिर समितीनेही हा चित्रपट बनवण्यास मान्यता दिली आहे.

हेही वाचा: Ram Mandir Ayodhya: '१४ जिल्ह्यांमधून राम मंदिरासाठी ४५ कोटींचा निधी गोळा'

अमर उजालाच्या रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन आणि प्रसून जोशी यांनी चित्रपटासाठी कोणतीही फी घेतलेली नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत. द्विवेदी यांनी अनेक दशकांपूर्वी दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या चाणक्य मालिकेचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते आहेत.

हेही वाचा: Big Boss 16: एमसी स्टॅनला शालीनसोबतचा वाद नडला; सलमाननं इज्जतच काढली ....

या संदर्भात श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय सांगतात की, या चित्रपटाच्या माध्यमातून मंदिर उभारणीचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवला जाईल. राम मंदिराचा 500 वर्षांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून यांच्यावर देण्यात आली आहे.

हेही वाचा: Big Boss16: निमृत कौरच्या बॉयफ्रेंडची बिग बॉसमध्ये एंट्री? लोक म्हणताय, ‘बिचारा अब्दु’

समोर आलेल्या माहितीनुसार रामजन्मभूमीच्या इतिहासावर चित्रपट बनविण्याच्या योजनेला शनिवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात आले. रामजन्मभूमी परिसरातच या बैठकीचे अयोजन करण्यात आले होते. लवकरच या योजनेचे काम सुरू होणार आहे. त्याचबरोबर इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्सचे सचिव सच्चिदानंद जोशी हे या चित्रपटादरम्यान समन्वयक म्हणून काम करणार आहेत.