esakal | बॉलीवूड चित्रपट निर्माते नितीन मनमोहन यांना मातृशोक
sakal

बोलून बातमी शोधा

बॉलीवूड चित्रपट निर्माते नितीन मनमोहन यांना मातृशोक

बॉलीवूड चित्रपट निर्माते नितीन मनमोहन यांना मातृशोक

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - प्रख्यात बॉलीवूड चित्रपट निर्माते नितिन मनमोहन यांच्या आईंचे (bollywood film producer) निधन झाले आहे. कांता मनमोहन असे त्यांचे नाव होते. दिवंगत अभिनेते मनमोहन यांच्या त्या पत्नी होत्या. कांता मनमोहन यांनी रविवारी पहाटे आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. या घटनेनं बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी नितिन यांचे सोशल मीडियावरुन सांत्वन केले आहे. त्यांच्या परिवारावर दु;खाचा डोंगर कोसळला आहे. मनमोहन यांच्या परिवारातील एका सदस्यानं या घटनेविषयी माहिती दिली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितिन मनमोहन यांच्या मातोश्रींवर सांताक्रुझ येथील वैंकुंठनिवासमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटीही उपस्थित राहणार आहे. त्यांच्या परिवारातील सदस्यही याप्रसंगी उपस्थित राहणार आहे. कांता मनमोहन या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या.

कांता मनमोहन या बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेता मनमोहन यांच्या पत्नी होत्या. मनमोहन यांनी बॉलीवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्य़े भूमिका केली होती. त्यात ये रास्ते है प्यार के, शहिद, मोहब्बत जिंदगी है, यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. दिवंगत अभिनेता मनमोहन यांचे चिरंजीव नितीन मनमोहन हे बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माते आहेत. त्यांनी बोल राधा बोल, लाडला, दिवानगी, भूत आणि यमला पगला दिवाना सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

हेही वाचा: "खान आडनावामुळे आर्यन पीडित अन् सुशांत हिंदू असल्यामुळे व्यसनाधीन?"

हेही वाचा: Drugs Case: अशी होती आर्यन खानची तुरुंगातील पहिली रात्र

loading image
go to top