चित्रपटांपुढे भविष्यात 'OTT' चे आव्हान- सिम्मी जोसेफ

निर्माते शेलना के. आणि सिम्मी यांनी इनिशिएटीव्ह फिल्म्सच्या बॅनऱखाली कॅपिटलवुडसच्या सहयोगानं 'अन्य' या हिंदी व मराठी (Bollywood movies) चित्रपटाची निर्मिती केली आहे.
director writer simmi joshef interview
director writer simmi joshef interview esakal

Bollywood News: निर्माते शेलना के. आणि सिम्मी यांनी इनिशिएटीव्ह फिल्म्सच्या बॅनऱखाली कॅपिटलवुडसच्या सहयोगानं 'अन्य' या हिंदी व मराठी (Bollywood movies) चित्रपटाची निर्मिती केली आहे. दाक्षिणात्य लेखक-दिग्दर्शक सिम्मी जोसेफ यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. विविध पुरस्कार (Tollywood News) सोहळ्यांमध्ये हा चित्रपट गौरविला गेला आहे. आता तो चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त सिम्मी यांच्याशी केलेली बातचीत..

1. दिग्दर्शक म्हणून तुमची सुरुवात कशी काय झाली ?

-सुरुवातीला मी विविध कथा लिहायचो. एक लेखक (स्टोरी रायटर) म्हणून मी सुरुवात केली. मग स्वतःच्या चित्रपटासाठी स्टोरी लिहायला सुरुवात केली. तसं पाहायला गेलं तर मला लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीची आवड होती. त्यामुळे तेव्हापासूनच मी या गोष्टींचा खोलवर अभ्यास करत गेलो. त्यानंतर अनेक डॉक्युमेंटरी, शॉर्टफिल्म यांचा अभ्यास केला. विविध प्रकारचे चित्रपट पाहिले. मल्याळम चित्रपटांसाठी काही कथा लिहिल्या. माझे शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण केरळात झाले आणि पुढील शिक्षणासाठी मी दिल्लीत गेलो. तेथे शिक्षण घेत असतानाच मला अन्य या चित्रपटाची कथा सुचली.

2. अन्य या चित्रपट नेमकी कथा काय आहे..

- हा चित्रपट वास्तववादी घटनेवर बेतलेला आहे. दिल्लीतील जेएनयू या संस्थेत शिकत असतानाची गोष्ट. तेथे माझा एक अपंग मित्र होता. एका रात्री तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, की माझे एका मुलीवर प्रेम आहे आणि त्याकरिता तू मला मदत करायची आहे. बस्स. तेथे मला या चित्रपटाचा एक धागा सापडला. ही गोष्ट सन २०१४ मधील. त्यानंतर मी या गोष्टीवर केले. अतुल कुलकर्णीशी संपर्क साधला आणि त्याला माझी ही कथा ऐकविली. त्याला ती आवडली. ही कथा आहे एक लेखक, एक दिग्दर्शक आणि एक निर्माता यांची. या चित्रपटात रायमा सेन दिग्दर्शक आहे. निर्माता आहे भूषण प्रधान आणि अतुल कुलकर्णी लेखक. हे तिघे जण एक माहितीपट बनविण्यासाठी बाहेर पडतात. परंतु त्यांना खूप अडचणी येतात. मग त्यांच्या मदतीला येतो प्रथमेश परब. त्याची भूमिका गमतीशीर आहे. सत्य घटनेवर आधारलेला हा चित्रपट मानव तस्करीवर प्रकाशझोत टाकणारा आहे. एका डॅाक्युमेंट्रीचा आधार घेऊन समाजातील कटू वास्तव आणि भयावह सत्य सादर करण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. हिंदीचे लेखन मी केलेआहे तर मराठीचे लेखन महेंद्र पाटील यांनी केले आहे.

3. एक दिग्दर्शक म्हणून तुमचा पहिलाच चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे तुम्हाला कसं वाटत आहे ?

- आनंद तर आहेच शिवाय भीतीदेखील मनात आहे. कारण आजची पिढी व आजच्या काळातील प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. आजकाल बहुतांश प्रेक्षक हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहण्यापेक्षा घरातच आपल्या कम्फर्ट झोनमध्ये पाहणं पसंद करत आहेत.त्यामुळे त्याला चित्रपटगृहात आणणे कठीण झाले आहे. सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहण्याचा कल प्रेक्षकांचा कमी झाला आहे. त्यामुळे आमच्या टीमला अशी भीती आहे की, प्रेक्षक चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहणार की नाहीत याची... परंतु प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहावा अशी माझी इच्छा आहे.

director writer simmi joshef interview
Sarsenapati Hambirrao Movie Review : दमदार अभिनय, खणखणीत संवाद

4. वास्तववादी घटनेवर चित्रपट बनवावा असे तुम्हाला का वाटले... ?

--मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला आवडतात. काल्पनिक कथानकांपेक्षा प्रेक्षक असा कथानकांना अधिक पसंती देतात. त्यामुळे असे बनतात. सत्य परिस्थिती प्रेक्षकांना सांगितली तर ते निश्चितच आवडीने पाहतात. प्रेक्षक तो पाहताना त्या चित्रपटात गुंतून जातो. आता हा चित्रपट मी हिंदी व मराठी भाषेत बनविला असला तरी भविष्यात अन्य भाषांमध्येही चित्रपट बनविणारच आहे. कारण चित्रपटाला भाषेचे बंधन नसते. चित्रपटाची कथा महत्त्वाची असते. हा चित्रपट मला मल्याळम भाषेतही बनवायचा होता. परंतु आर्थिक गणित जमले नाही म्हणून तो बनविण्यात आला नाही.

5. एखादा मराठी चित्रपट मल्याळम भाषेत बनविणार का...

- मराठीमध्ये उत्तमोत्तम चित्रपट बनत आहेत. त्यामुळे यापुढे मला एखाद्या मराठी चांगल्या चित्रपटाचा मल्याळम भाषेत रिमेक करायला नक्कीच आवडेल. प्रथमेश परबला घेऊन मल्याळम चित्रपट बनविण्याची इच्छा आहे.

director writer simmi joshef interview
Bollywood VS South: कमाईतही टॉलीवूड दिग्दर्शक 'टॉपर', बॉलीवूड 'काठावर'

6. अन्य या चित्रपटाला अनेक चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आणि चित्रपट महोत्सवात गौरविले गेले आहे. त्याबाबतीत तुम्हाला काय वाटते ?

- आमच्या चित्रपटाला चार ते पाच मोठे पुरस्कार मिळालेले आहेत. या गोष्टीचा आनंद निश्चित आहे. आम्हाला या चित्रपटातून जो संदेश द्यायचा आहे तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे हीच आमची इच्छा आहे. कोणत्याही फिल्म फेस्टिवलमध्ये अवॉर्ड मिळणं ही छोटी गोष्ट नाही. माझ्यासाठी तर ही खूप मोठी गोष्ट आहे. अशा फेस्टिवलमध्ये इतर चित्रपट देखील स्पर्धेत असतात. आणि त्यात तुम्हाला अवॉर्ड मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते.

7. दोन भाषांमध्ये चित्रपट बनवणे हे कितपत अवघड आहे, तुम्हाला याबद्दल काय वाटतं ?

-दोन भाषांमध्ये चित्रपट बनवणं हे खरंच अवघड असतं. परंतु आजच्या काळात या गोष्टी सहजरीत्या पार पडत आहेत. कारण आता टेक्नॉलॉजी तेवढी वाढत गेलेली आहे. कोणत्याही भाषेचा चित्रपट असुदे भाषेचा अडथळा प्रेक्षकांना जाणवत नाही. अनेक चित्रपट डब केलेले असतात किंवा सबटायटल चित्रपटांना असतोच, त्यामुळे प्रेक्षक चित्रपटाचा आनंद लुटतात. काही वर्षांपूर्वी दोन भाषेत चित्रपट बनविणं आव्हान होतं. परंतु आता तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. त्यामुळे सगळे काही सहज शक्य झाले आहे.

8. सध्या प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत याबद्दल काय सांगाल...

-आता ओटीटीचे मोठे आव्हान आहे. सध्या ओटीटीमध्ये मोनोपाॅली चालू आहे असं मला वाटतं. जे मोठमोठे ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत तेच दिग्दर्शक, निर्माते व कलाकार या गोष्टी ठरवत आहेत. आणि त्यांच्यानुसार ते प्रोजेक्ट बनवत आहेत. जे मोठमोठे प्रॉडक्शन हाऊसेस आहेत त्यांनी आधीच ओटीटी प्लॅटफॉर्म सोबत आपले हक्क वाटून घेतले आहेत. त्यामुळे अधलेमधले किंवा छोटी छोटी प्राॅडक्शन हाऊसेस आहेत त्यांचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म घेण्यास कधी कधी नकार दर्शवितात. जे मोठे कलाकार आहेत त्यांचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म घेतात. तर माझ्या दृष्टीने हा मोनोपॉली कारभार सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com