
जानेवारी महिन्यात अनेक सिनेमे थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहेत. जाणून घेऊया कोणकोणते सिनेमे वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात रिलीज होणार आहेत.
मुंबई- २०२१ या नवीन वर्षात लोकांसाठी मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. २०२० मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक सिनेमांनी नशीब आजमावलं. तर वेगवेगळ्या विषयांवरील वेब सीरीज रिलीज झाल्या. आता थिएटर सुरू झाल्याने लोक सिनेमे पाहण्यासाठी थिएटरकडे वळत आहेत. जानेवारी महिन्यात अनेक सिनेमे थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहेत. जाणून घेऊया कोणकोणते सिनेमे वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात रिलीज होणार आहेत.
रामप्रसाद की तेहरवी
नसीरुद्दीन शाह आणि सुप्रिया पाठक यांचा 'रामप्रसाद की तेहरवी' हा सिनेमा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातून सीमा पाहवा दिग्दर्शनात उतरली आहे. सिनेमात कोंकणा सेन, विक्रांत मेसी, विनय पाठक आणि मनोज पाहवा नसीरुद्दीन शाह आणि सुप्रिया पाठक यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत.
12 ओ क्लॉक
राम गोपाल वर्माचा '12 ओ क्लॉक' हा सिनेमा 8 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात मिथुन चक्रवर्ती, मकरंद देशपांडे, दिव्या जगदाळे, मानव कौल, अली असगर, दलीप ताहिल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा एक हॉरर सिनेमा आहे. राम गोपाल वर्मा बऱ्याच दिवसांनंतर या हॉरर सिनेमात झळकणार आहेत.
हाथी मेरे साथी
राणा दग्गुबाती आणि पुलकित सम्राटचा सिनेमा 'हाथी मेरे साथी' हा सिनेमा 15 जानेवारीला रिलीज होणार आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर तुमच्या मनात प्राण्यांविषयीचं प्रेम वाढेल.
मेरे देश की धरती
दिव्येंदु शर्मा आणि अनुप्रिया गोयकाचा सिनेमा 'मेरे देश की धरती' हा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा सिनेमा 22 जानेवारीला रिलीज होणार आहे. 'मेरे देश की धरती' या सिनेमात देशातील शेतकऱ्यांची स्थिती दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा 2020 मध्ये रिलीज होणार होता पण लॉकडाऊनमुळे रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.
bollywood films will come out at the beginning of the new year