कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी झटणाऱ्यांना हिंदी चित्रपटसृष्टी करणार मदत

hritik
hritik

मुंबई- कोरोनाग्रतांच्या मदतीसाठी दिवस-रात्र झटणाऱ्या डाॅक्टर्स, नर्स तसेच अन्य कर्मचारी यांना मदत करण्यासाठी आता हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार पुढे सरसावले आहेत. अभिनेते रजनीकांत, कमल हसन, पवन कल्याण, फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांच्याबरोबरच आता अभिनेता हृतीक रोशन, दिग्दर्शक राजकुमार हिरानी अशा काही सेलिब्रेटींनी मदत करण्याचे ठरविले आहे. आणखीनही काही कलाकार मदतीचा हात देणार आहेत.

सध्याच्या कठीण प्रसंगी अभिनेता हृतिक रोशनने मदतीचा हात पुढे केला आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी एन ९५ आणि एफएफपी ३ मास्कचे वाटप करणार असल्याचे त्याने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. 'सध्याची परिस्थिती फारच गंभीर आहे. त्यामुळे आपल्याला जमेल तितकी मदत आपण करायला हवी. मी मुंबई महापालिकेच्या कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी एन ९५ आणि एफएफपी ३ मास्कची मदत करत आहे.' असे ट्विट करत त्याने याची माहिती दिली आहे. याशिवाय त्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेही आभार मानले आहेत.

हृतिकबरोबरच दिग्दर्शक राजकुमार हिरानीही हॅशटॅग आय स्टँड विथ हुमानिटी (#istandwithhumanity) या अभियानातून हातावर पोट असणाऱ्या आणि दैनंदिन मजुरीचे काम करणाऱ्या कामगारांना मदत करण्यास पुढे सरसावले आहेत आणि त्यांना मोठा दिलासा दिला आहे.

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी हे अभियान सुरू केले असून या अभियानाला पाठींबा देणारे पहिले बॉलिवूड सेलेब्रिटी म्हणून राजकुमार पुढे आले आहेत. या अभियानातून प्रत्येक दैनंदिन मजुरी काम करणाऱ्या कामगाराच्या कुटुंबाला १० दिवसांसाठी आवश्यक तितका अन्नाचा साठा पुरवणार आहेत. यामध्ये एक हजार रुपयांची रेशनची बॅग देण्यात येणार आहे. ही मदत ऑनलाईन केली जाऊ शकते आहे. http://iahv.org/in-en/donate/ या संकेतस्थळावर ही मदत केली जाऊ शकते. याशिवाय राजकुमार यांनी ट्विट करत इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे.' आपण सर्वांनी दैनंदिन मजुरी कामगारांना मदत करूया. चित्रपसृष्टीतील सर्वच त्यांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. मी या अभियानाचे समर्थन करतो. तुम्ही सर्वांनी एकत्रितपणे दैनंदिन मजुरी कामगारांना मदत करण्यासाठी पाठींबा द्या.' असे त्यांनी ट्विट केले आहे. 

अभिनेत्री दिया मिर्झाही ती राहत असलेल्या ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांना मदत करत आहे. नुकताच तिने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे. या काही दिवसात ती तिच्या सोसायटीमध्ये राहत असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मदत करत आहे.

तिने तिच्या सोसायटीमध्ये आठवड्यातून दोनदा तरी भाजी विक्रेता आणि फळ विक्रेता येतील अशी व्यवस्था केली आहे. याशिवाय तिने आपल्या सोसायटीमध्ये जंतुनाशकाच्या फवारणीचे काम केले आहे. यासोबत तिने इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे.

bollywood to generate funds for ngos providing financial help to the needy corona patients

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com