coronavirus च्या भीतीमुळे सलमान-अनुष्का गेले मुंबई सोडून..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

लॉकडाऊन घोषित करुनही अनेकजण पॅनिक होत भाजीमार्केट, किराणा दुकानांकडे गर्दी करत आहेत...आणि म्हणूनंच काही सेलिब्रिटींनी सोशल डिस्टन्सिंगचा निर्णय घेतला आहे...

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे..याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री ८ वाजता कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी आणि आणखी नागरिक कोरोनाबाधित होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली..हे २१ दिवसांचं लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत राहणार आहे..हे लॉकडाऊन कर्फ्यु सारखंच समजा असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे..

हे ही वाचा: वर्कआऊटचे व्हिडिओ शेअर करणा-यांवर भडकली फराह खान, म्हणाली 'बस्स करा आता..'

लॉकडाऊनमुळे सध्या सर्वजण घरात आहेत..मात्र या दिवसात घरात बसून करावे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांसोबतंच सेलिब्रिटींनाही पडला आहे..घरातंच राहून फिट राहण्याचे अनेक उपाय सेलिब्रिटी आजमावत आहेत..अशा परिस्थितीत काही सेलिब्रिटींनी मात्र मुंबई आणि गर्दीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे..अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे..लॉकडाऊन घोषित करुनही अनेकजण पॅनिक होत भाजीमार्केट, किराणा दुकानांकडे गर्दी करत आहेत...आणि म्हणूनंच काही सेलिब्रिटींनी सोशल डिस्टन्सिंगचा निर्णय घेतला आहे...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@cmomaharashtra_ @My_bmc @adityathackeray @rahulnarainkanal

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी अभिनेता सलमान खान त्याच्या कुटूंबियांना घेऊन त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर गेला आहे..मात्र एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सलमान खानची आई सलमा खान आणि वडिल सलीम खान हे मात्र फार्महाऊसवर गेलेले नाहीत..ते सध्या वांद्रे येथील घरातंच राहत आहेत..सलमानसोबत त्याची बहीण अर्पिता खान आणि तिची मुलं गेली आहेत..सलमानचं पनवेल येथील फार्महाऊस हे सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे..विशेष म्हणजे फार्महाऊस असल्याने तिथे ताज्या भाज्या आणि फळं मिळू शकतात..त्यामुळे सलमान आता गर्दीपासून दूर आपल्या कुटूंबासोबत निवांत वेळ घालवत आहे..

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

एकता दिखाएँ, जीवन और देश बचाएँ  ‪@narendramodi

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

तर दूसरीकडे अभिनेत्री अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत अलिबागमध्ये राहत असल्याचं कळतंय..विराट आणि अनुष्काने स्वतः मुंबई आणि मुंबईतील गर्दी पासून दूर राहत नागरिकांना देखील सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन केलं आहे.. सलमान, अनुष्का-विराटसोबतंच खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते प्रकाश राज सुद्धा शहरापासून लांब एका गावात आपल्या कुटूंबासोबत राहत आहेत...काही दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल साईटवर 'मी पहिल्यांदाच गावातील जीवन अनुभवत आहे' असं म्हटलं होतं..

salman khan and virat kohli left mumbai to practice social distancing  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salman khan and virat kohli left mumbai to practice social distancing