Tabassum Death: करण जोहरने चोरली होती तबस्सुम यांची आयडिया? 'कॉफी विथ करण'... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tabassum Death: करण जोहरने चोरली होती तबस्सुम यांची आयडिया? 'कॉफी विथ करण'...

Tabassum Death: करण जोहरने चोरली होती तबस्सुम यांची आयडिया? 'कॉफी विथ करण'...

ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांचे १८ नोव्हेंबर रोजी निधन झाल्याने त्यांच कुटुंब, मित्र आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्या 78 वर्षांच्या होत्या आणि हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी त्याच्या निधनाचं वृत्त समोर आलं. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहे. त्यातच करण जोहर याचाही त्यांच्या संबधीत एक किस्सा समोर आला आहे.

हेही वाचा: Tabassum passes away: ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन....

1972 ते 1993 या कालावधीत फुल खिले हैं गुलशन गुलशन या सेलिब्रिटी चॅट शोमूळे तबस्सुम घराघरात पोहचल्या होत्या.. एक अभिनेत्री असण्यासोबतच तबस्सुम या 1972 ते 1993 या कालावधीत फूल खिले हैं गुलशन गुलशन या सेलिब्रिटी चॅट शोचे सूत्रसंचालन देखील केले. अनेक अभिनेत्यासह चित्रपट निर्माता करण जोहरलाही त्यांची मुलाखत घेण्याची शैली आवडायची. खरं तर, तबस्सुम या त्याच्यासाठी प्रेरणा असल्याचंही करणने अनेकदा सांगितलं  आहे.

अलीकडेच ट्विंकल खन्ना हिच्या एका मुलाखतीत करणने सांगितले होतं की त्याच्या मनात मोठं झाल्यावर तबस्सुमसारखी बनण्याची इच्छा कायम होती. तो त्यांचा शो नेहमी पहायचा. तर एकदा माझ्या वडीलांनी विचारलं 'तुला काय बनायचं आहे?' मी म्हणालो की मला तबस्सुम सारख बनायचं आहे. मलाही त्याच्या शो सारखा चॅट शो करायचा होता. तो शो खरोखरच आयकॉनिक होता.

हेही वाचा: Karan Johar Troll: करणला 'सीमा आंटी' का म्हणू लागलेयत लोक?, स्वतः खुलासा करत म्हणाला...

त्यांने कॉफी विथ करण या चॅट शोची कल्पना त्यांचे दिवंगत वडील यश जोहर यांना सुचली तेव्हाचीही आठवणही त्यांने सांगितली. तो म्हणाला,“ माझे वडील हयात असताना मी त्यांना ही क्लपना सांगितली होती आणि ते म्हणाला, ' अच्छा तु तुझ्या मित्रांना बोलवणार आणि त्याच्याशी गप्पा मारणार आणि लोक हे पाहणार? दररोज तु ज्या मित्रांशी गप्पा मारतोस त्यांना बोलण्यासाठी कोण तुम्हाला पैसे का देईल ? त्याने मला विचारलं, ' तूला तबस्सुम बनायचं का?' "