esakal | आला रे आला नागराजचा 'झुंड' आला, प्रदर्शनाची तारीख ठरली 
sakal

बोलून बातमी शोधा

bollywood mahanayak big b amitabh bachchan and marathi director nagraj majule declare movie jhund release date on social media

आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणा-या नागराज यांच्या झुंड या चित्रपटाचे सर्वांना वेध लागले आहेत.

आला रे आला नागराजचा 'झुंड' आला, प्रदर्शनाची तारीख ठरली 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  बहुचर्चित, प्रतिक्षेत अशा झुंड चित्रपटाच्य़ा प्रदर्शनाच्या मुहूर्त ठरला आहे. कायदयाच्या कचाट्यातून हा सिनेमा सुटला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आज शिवजयंतीचे औचित्य साधून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यात त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. झुंडमध्ये बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका आहे. सध्याच्या घडीला मराठीतील प्रसिध्द दिग्दर्शकांच्या यादीत नागराज यांचे नाव घेतले जाते.

आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणा-या नागराज यांच्या झुंड या चित्रपटाचे सर्वांना वेध लागले आहेत. कोरोनाच्या अगोदर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यावेळी त्याला प्रचंड प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. नागराज यांच्या चित्रपटांची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत असतात. झुंडमध्ये महानायक अमिताभ काम करणार असल्यानं चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत आहेत. शिवजयंतीच्या निमित्तानं नागराज यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. नागराजचा ‘झुंड’ हा चित्रपट येत्या 18  जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या चित्रपटाचं संगीत अजय-अतुल करणार आहेत. अमिताभ यात फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारणार आहे.

नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावरुन प्रदर्शन तारीख जाहिर केली आहे.   हा चित्रपट स्लम सॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर असल्याचं वृत्त यापूर्वी आजतकने दिले  होतं. एका वर्षापूर्वी ह्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. मात्र काही कायदेशीर अडचणींमुळे आणि कोरोनामुळे हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. 18 जून 2021 मध्ये आता तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या चित्रपटाच्या टीमनंही मंजुळे यांची सोशल मीडियावरील पोस्ट शेअर केली आहे.

सैराट फेम परशा अर्थात आकाश ठोसरनंही सोशल मिडीया अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केलं आहे.  त्यात मराठीतला प्रसिध्द दिग्दर्शक आणि  प्रख्यात संगीतकार अजय-अतुल. असं कॉम्बिनेशन प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार नाही.