Malaika Arora Pregnancy News: मलायकाच्या गुडन्यूजवर अर्जुन भडकला!

हि बातमी वाचल्यानंतर अर्जुन कपूर चांगलाच तापला आहे.
Malaika Arora
Arjun Kapoor
Malaika Arora Arjun KapoorEsakal

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहेत आणि दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल काहीही बोललेलं नाही. ते बर्‍याचदा डेटवर जाताना, सुट्टी घालवताना आणि कार्यक्रमांमध्ये हँग आउट करताना दिसतात. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार दावा करण्यात आला होता की मलायका गर्भवती आहे. ती अर्जुनच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. लंडनच्या सुट्टीच्या वेळी त्यांच्या जवळच्या मित्रांना गर्भधारणेची घोषणा केली असल्याचा दावाही यात करण्यात आला होता.

मात्र हि बातमी वाचल्यानंतर अर्जुन कपूर चांगलाच तापला आहे. त्याने या बातमीचा स्क्रीनशॉट त्याच्या इस्टांग्रामवर पोस्ट केलाय आणि या बातमीचे खंडन केले आहे. त्याने मलायका गर्भवती नसल्याचं सांगितलंय. बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करताना अर्जुनने एका लांबलचक पोस्टमध्ये आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याचे धाडस करू नका असं बाजवलं आहे.

Malaika Arora
Arjun Kapoor
Malaika Arora: अगं बाई! मलायकाने पसरवली सौंदर्यची हिरवळ...

दरम्यान मलायका अरोरा सध्या तिच्या आगामी शोमध्ये व्यस्त आहे. तिचा मुव्ह इन विथ मलायका या शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच रिलीज होणार आहे. त्याचबरोबर ती आयुष्मान खुरानाच्या चित्रपटात डान्स नंबर करतांही दिसली.

हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

मलायका अरोराने अरबाज खानला घटस्फोट दिला आहे. तिला एक मुलगाही आहे. घटस्फोटानंतर मलायका आणि अर्जुनने अनेक वर्षे गुपचूप डेटिंग केल्यानंतर 2019 मध्ये त्यांच्या नात्याबद्दल सार्वजनिक केले. त्यांच्या वयातील अंतरामुळे त्यांना सुरुवातीला ट्रोल करण्यात आले होते. मात्र, दोघांनी तसे केले नाही. अर्जुनने यापूर्वी कॉफी विथ करणवर खुलासा केला होता की तो मलायकासोबत सेटल होण्यास तयार नाही.

दोघांनी अद्याप लग्न केले नाही. याआधी गेल्या काही दिवसांपासून बातम्या येत आहेत की अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा लवकरच लग्न करू शकतात.मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी अद्याप या बातम्यांना अधिकृत दुजोरा दिलेला नाही . तरी त्याचे चाहते दोघ लग्न कधी करतात हे जाणून घेण्यासाठी उत्सूक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com