manushi chhillar: चर्चा तर होणारच! मानुषी छिल्लर करतेय मिस्ट्री मॅनला डेट... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manushi Chhillar

Manushi Chhillar: चर्चा तर होणारच! मानुषी छिल्लर करतेय मिस्ट्री मॅनला डेट...

Manushi Chhillar dating businessman  मिस वर्ल्डचा किताब जिंकलेली मॉडेल आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर ही कायमच तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजमुळे चर्चेत असते. 2017 मध्ये मानुषीने मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर अक्षय कुमारसोबत तिने 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

 मानुषीचं आरस्पानी सौंदर्य कुणालाही घायाळ करेल असच आहे. तिचा चाहता वर्गही तगडा आहे. मात्र मानुषीच्या चाहत्यांसाठी आता काहीशी भ्रमनिरास करणारी बातमी समोर आली आहे. मानुषी आता सिंगल नाही तर तिच्या आयूष्यात तिच्या ड्रिम मॅनची एंट्रि झाली आहे. ती बिझनेसमनला डेट करत असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलय. ती भारतातील आघाडीची ब्रोकरेज कंपनी झिरोधाचा(zerodha) सह-संस्थापक निखिल कामथ याला डेट करत आहेत.

हेही वाचा: महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

मानुषी आणि निखिल यांनी सध्या त्यांच्या नात्याबद्दल गुपित राखलं असंल तरी दोघेही अनेकदा एकत्र वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. नुकतंच दोघ एकत्रित ऋषिकेशला फिरायला गेले होते. दोघांच्या जवळच्या व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघांच प्रेम चांगलंच बहरलं असून आता त्यांचं नातं बरच पुढे गेलं आहे. सध्या दोघेही एकत्र राहू लागलेत.

मात्र सध्या, मानुषी तिच्या करीअरवर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे तिला तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल मीडियासमोर फारसा खुलासा करायचा नसल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच मानुषी आणि निखिल यांच्या कुटुंबीयांमध्ये ही जवळचचे संबंध आहेत. दोन्ही कुटुंबीयांना देखील त्यांच्या नात्याबद्दल तसंच खाजगी आयुष्याबद्दल चर्चा रंगू नये अशी इच्छा आहे.

हेही वाचा: Big Boss 16: एमसी स्टॅनला शालीनसोबतचा वाद नडला; सलमाननं इज्जतच काढली ....

बिझनेसमन निखिल कामथने बंगळूरमधील उद्योजिका अमांडा पूर्वांकरा हिच्यासोबत 18 एप्रिल 2019 ला इटलीमध्ये लग्न केलं होतं. मात्र वर्षभरातच दोघेही विभक्त झाले. तर दुसरीकडे मिस वर्ल्ड झाल्यापासूनच मानुषी छिल्लर चांगलीच चर्चेत होती. मात्र आजवर तिचं नाव कुणासोबतही जोडलं गेलं नव्हतं. दरम्यान मानुषी आणि निखिल कामथ यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं असलं तरी दोघांकडूनही या वृत्तावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही.