'पापा कहते है बडा नाम करेगा, बेटा हमारा एैसा काम करेगा' 

 bollywood most popular singer udit narayan celebrated his 60 th birthday
bollywood most popular singer udit narayan celebrated his 60 th birthday

मुंबई - जुन्या गाण्यांमध्ये जो गोडवा आहे तो आताच्या गाण्यांमध्ये नाही अशी ओरड जाणकार रसिकांची नेहमीच सुरु असते. अशातच बॉलीवूडमधील काही गायक आहेत ज्यांच्या आवाजाने सर्वांना वेड लावले.

खासकरुन 80 ते 90 च्या दशकातील हिंदी चित्रपटांतील गीतांना त्यांनी आपल्या आवाजाने सजवलं, नटवलं आणि प्रेक्षकांपुढे सादर केलं. त्यांच्या त्या गाण्यांना रसिकांचे प्रेम मिळाले. 

1.  किशोर कुमार, लता मंगेशकर, आर डी बर्मन, आनंद मिलिंद, बप्पी लाहिरी यांच्याबरोबर काम केलेल्या प्रख्यात गायक उदित नारायण यांनी नुकतचं वयाच्या 65 पदार्पण केलं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना मोठया संख्येनं चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. खडतर प्रसंग, खाचखळग्यांनी भरलेल्या आयुष्यात उदित नारायण यांचा प्रवास संघर्षाचा राहिला आहे. 

2. कयामत से कयामत तक या चित्रपटापासून त्यांचा गायकीचा प्रवास सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. तेव्हापासून त्यांच्या अनोख्या गायकीने सगळ्यांना आपलेसं केलं. 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय गायक म्हणून उदित नारायण यांचे नाव घ्यावे लागते. 

3.  उदित नारायण यांनी आतापर्यत अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, देव आनंद, अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान, अमिर खान, अजय देवगण यांच्यासारख्या बड्या कलाकारांसाठी गाणं गायलं आहे. ती सर्व गाणी प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. 


4. 1970 साली त्यांनी नेपाळच्या रेडिओवरुन आपल्या गाण्याच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यावेळी ते मैथिलि फोक सिंगर म्हणून परिचित होते. त्यानंतर त्यांनी मॉडर्न नेपाळी गाणी गाण्यास सुरुवात केली. जवळपास आठ वर्षानंतर ते मुंबईला आले. 1980 पासून त्यांच्या बॉलीवूडमधील प्रवासाला सुरुवात झाली. 

5. मुंबईमध्ये उदित नाराय़ण एका नेपाळी स्कॉलरशिपच्या आधारावर आले होते. काही करुन आपल्याला भारतीय विद्या मंदिरात क्लासिकल म्यूझिक मध्ये शिकायचे आहे अशा उद्देशानं त्यांनी त्या स्कॉलरशिपचा स्वीकार केला होता. त्यावेळी प्रसिध्द संगीतकार राजेश रोशन यांनी त्यांना ब्रेक दिला. 

6. उन्नीस बीस या चित्रपटातून त्यांनी गाणं गायलं. प्रख्यात गायक मोहम्मद रफी यांच्यासोबत त्यांना गाण्याची संधी मिळाली. यानंतर बॉलीवूडमधल्या अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी गाणे गायले. आणि आपली वेगळी ओळख निर्माण केली. 

 7. उदित नारायण यांच्या आयुष्यात काही कमी वादळे आली नाहीत त्यांनी त्याचा सामना केला. 2006 मध्ये रंजना नारायण यांनी असा दावा केला की त्या उदित नारायण यांच्या पत्नी आहेत. मात्र याचा उदित याला जुमानले नाही त्यांनी या गोष्टीचा स्वीकार केला नाही.


8.  काही काळानंतर त्यांनी रंजनाचा स्वीकार केला. पुढे 1985 मध्ये त्यांनी दीपा झा यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा असून त्याला आदित्य नारायणच्या नावाने ओळखले जाते. गाण्याबरोबर उदित यांनी अभिनयही केला आहे हे फार थोडया जणांना  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com