'तो कधीच नियम पाळत नाही', सलमानच्या दिग्दर्शकानं वाचला पाढा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman khan
'तो कधीच नियम पाळत नाही', सलमानच्या दिग्दर्शकानं वाचला पाढा

'तो कधीच नियम पाळत नाही', सलमानच्या दिग्दर्शकानं वाचला पाढा

बॉलीवू़डचा भाईजान (Bollywood Actor Salman Khan) म्हणून सलमान खान सर्वांना परिचित आहे. तो त्याच्या आक्रस्ताळेपणासाठी देखील ओळखला जातो. त्याचा रागीट स्वभाव आणि त्याने रागाच्या भरात केलेली कृत्यं ही देखील सर्वांना परिचित आहे. अशा सलमानविषयी त्याच्यासोबत काम केलेल्या काही दिग्दर्शकांनी तक्रारी वजा पोस्ट केल्या आहेत. त्याच्या सोबत टायगर, टायगर जिंदा है सारखे चित्रपट करणाऱ्या (Kabir Khan) कबीर खाननं सलमानच्या बेशिस्तपणाविषयी सांगितलं आहे. तो म्हणतो सलमान कधीही नियमांचे पालन करत नाही. ज्याठिकाणी प्रोटोकॉल येतात त्याठिकाणी सलमाननं शिस्त मोडली म्हणून समजा असं कबीरनं म्हटलंय. (Bollywood movie Director Kabir Khan share Salman Khan)

बॉलीवूडच्या दबंगफेम अभिनेत्यानं (Bollywood Daband Fame Actor) काही दिवसांपूर्वी बजरंगी भाईजानच्या सिक्वेलची घोषणा केली होती. मात्र त्यानं त्या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात कधी होणार याविषयी सांगितलेलं नाही. मुंबईमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये सलमाननं बजरंगी भाईजानविषयी सांगितलं होतं. त्याच्या सिक्वेलचं नाव 'पवन पुत्र भाईजान' असं असणार आहे. वास्तविक म्हणजे बजरंगी भाईजनची 2 ची स्क्रिप्ट लिहिलेली नाही. मात्र त्या दिग्दर्शकाचं म्हणणं असं आहे की, सलमान हा कधीही प्रोटोकॉल पाळत नाही.

हेही वाचा: यंदाच्या वर्षी या बॉलीवूड (Bollywood) सेलिब्रेटींच्या घरात हलला पाळणा...

कबीरनं सांगितलं की, 'पवन पुत्र भाईजान' च्या कथेवर काम सुरु आहे. त्याची संहिता लेखनाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मी या चित्रपटासाठी फार उत्सुक आहे. मात्र आता त्यावर सलमानची वेळ कधी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याचे कारण सलमान हा फार कमी वेळा उपलब्ध होणारा अभिनेता आहे. त्याची वेळही तातडीनं मिळत नाही. मुळात मला त्या सिक्वेल बनवण्यात काही रस नाही. कारण मुळ चित्रपट हा यशस्वी झाला होता. मात्र जर चांगली स्टोरी मिळत असेल तर मी नक्कीच विचार करेल. असंही कबीरनं म्हटलं आहे.

हेही वाचा: नो हेल्मेट- नो पेट्रोल नंतर आता No Helmet- No Co-operation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top