मंदिराला फेऱ्या का मारते? प्रश्नावर सारा अली खाननं दिलं उत्तर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सारा अली खान
मंदिराला फेऱ्या का मारते? प्रश्नावर सारा अली खाननं दिलं उत्तर...

मंदिराला फेऱ्या का मारते? प्रश्नावर सारा अली खाननं दिलं उत्तर...

बॉलीवूडमध्ये (Bollywood) गेल्या काही वर्षापासून चर्चेत आलेल्या सारा अली खाननं (Sara ali khan) मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुतसोबत (Sushant singh Rajput) तिनं केदारनाथ नावाचा चित्रपट केला होता. त्यालाही प्रेक्षकांची दाद मिळाली होती. दोन आठवड्यांपूर्वी तिचा टॉलीवूडचा सुपरस्टार धनुषसोबत अतरंगी रे नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील तिच्या अभिनयाचं समीक्षकांनी कौतूक केलं आहे. सोशल मीडियावरही सारा नेहमी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. आता ती तिला एका वेगळ्या कारणासाठी ट्रोल करण्यात आले आहे. (Sara Ali Khan Trolled)

अतिरेकी वागणं वाईटचं. असं साराचं म्हणणं आहे. मला लोकं काय म्हणतात याचा काही एक फरक पडत नाही. मात्र विचारसरणी बदलण्याची गरज आहे. ती काळाची गरज आहे. आपल्याकडे एकसुरी विचारसरणी आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दैनिक भास्करला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सारानं आपल्याला धर्मावरुन कशाप्रकारे ट्रोल केले जाते याविषयी सांगितलं आहे. जेव्हा साराला मंदिराला फेऱ्या का मारते असा प्रश्न विचारला तेव्हा तिनं उत्तर दिलं की, मला मंदिरात गेल्यावर कडवट प्रतिक्रियेला सामोरं जावं लागतं.

हेही वाचा: जान्हवी, अनन्याला मी माझी स्पर्धक मानत नाही - सारा अली खान

अतिरेकी वागणं वाईटचं. असं साराचं म्हणणं आहे. मला लोकं काय म्हणतात याचा काही एक फरक पडत नाही. मात्र विचारसरणी बदलण्याची गरज आहे. ती काळाची गरज आहे. आपल्याकडे एकसुरी विचारसरणी आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दैनिक भास्करला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सारानं आपल्याला धर्मावरुन कशाप्रकारे ट्रोल केले जाते याविषयी सांगितलं आहे. जेव्हा साराला मंदिराला फेऱ्या का मारते असा प्रश्न विचारला तेव्हा तिनं उत्तर दिलं की, मला मंदिरात गेल्यावर कडवट प्रतिक्रियेला सामोरं जावं लागतं.

सारा (Sara Ali khan) ही नेहमी केदारनाथ, महाकाल आणि कामाख्या मंदिरात जाते. यावेळी देखील ती गेली होती. त्याप्रसंगी काही धर्मरक्षकांनी तिला तिच्या मंदिर प्रवेशावरुन ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. एका मुलाखतीमध्ये तिनं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. त्यामुळे आपण मंदिरात न जाता त्याच्याभोवती फेऱ्या का मारतो याचे कारण सांगितलं आहे. वास्तविक सारा कोणताही धर्म आणि जातीला मानत नाही. ज्याठिकाणी तिला प्रसन्नता मिळते त्याठिकाणापासून ती प्रेरणा घेत असल्याचे दिसून आले आहे. गुरुद्वारा असेल, मंदिर असेल किंवा मशिद यामध्ये साराची प्रार्थना सुरु असल्याचे तिनं सांगितलं आहे. मात्र आपल्याला विनाकारण ट्रोल केले जात असल्याचेही सांगितलं आहे. काही धर्माच्या रक्षकांनी धर्माचा ठेका घेतला आहे. त्यामुळे त्यांना असे वाटते की, आपण जे काही करतो आहोत ते खरं आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top