Amitabh Bachchan: ‘डॉन’ साठी प्रेक्षकांची लांबलेली रांग! 44 वर्षांपूर्वीचा फोटो|Bollywood News Amitabh Bachchan share Don | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood News Amitabh Bachchan

Amitabh Bachchan: ‘डॉन’ साठी प्रेक्षकांची लांबलेली रांग! 44 वर्षांपूर्वीचा फोटो

Big B Amitabh Bachchan: बिग बी अमिताभ बच्चन यांच्याविषयी प्रेक्षकांना अपार आनंद आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ बच्चन यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या बॉलीवूडमध्ये कार्यरत असणारे जे मान्यवर (Entertainment news) अभिनेते, दिग्दर्शक, पटकथाकार आहेत त्यांचे प्रेरणास्थान म्हणून अमिताभ यांचे नाव घेतले जाते. वय हा फॅक्टर ज्यांच्यासाठी केवळ आकडा (bollywood actor) आहे अशा अमिताभ यांचा उत्साह तरुण अभिनेत्यांना लाजवणारा आहे. अमिताभ हे सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणारे अभिनेते (social media viral post) आहेत. त्यांची एक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे.

हम जहा भी खडे होते है लाईन वहा से शुरु होती है, हा अमिताभ यांच्या एका चित्रपटातील संवाद आजही त्यांच्या व्यक्तिमत्वाला लागु होतो. अमिताभ यांचे (bollywood movies) चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये मोठी गर्दी उसळत असे. त्यापूर्वी तिकिट घेताना प्रेक्षकांच्या लांबवर रांगा लागल्याच्या आठवणी अमिताभ यांचे चाहते नेहमीच सांगत असतात. आता दस्तुरखुद्द अमिताभ यांनी त्यांच्या 44 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या डॉन या चित्रपटाविषयीची एक खास पोस्ट शेयर केली आहे. त्या पोस्टचा फोटो शेयर केल्यानंतर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बिग बी यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

यापूर्वी देखील बच्चन यांनी त्यांच्या जुन्या चित्रपटांचे फोटो, त्यांच्या चित्रिकरणाच्या आठवणी सोशल मीडियावर शेयर केल्या होत्या. आता त्यांनी 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या डॉन चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यामध्ये बच्चन यांनी हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरबाहेर किती मोठी गर्दी होती हे आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. त्या फोटोमध्ये तिकिट घेण्यासाठी प्रेक्षकांची किती मोठी रांग आहे हे आपल्याला दिसते.

हेही वाचा: Viral Video: शिल्पाला असं कधी पाहिलयं?

त्यावेळी डॉन या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकींग सुरु होती. बच्चन यांनी शेयर केलेला फोटो हा डॉनच्या अॅडव्हान्स बुकींगचा आहे. बच्चन यांनी लिहिलं आहे की, तब्बल एक मैल लांब रांग होती. डॉन हा चित्रपट तोवर प्रदर्शित व्हायचा होता. तुम्ही या फोटोंमध्ये पाहत असलेली रांग ही डॉन चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकींगची आहे. डॉन, कसम वादे, त्रिशुल, मुकद्दर का सिकंदर, गंगा की सौगंध एका वर्षात 5 ब्लॉकबस्टर. काही चित्रपट तर 50 आठवड्यांपर्यत सुरु होते. काय भारी दिवस होते ते...अशा शब्दांत अमिताभ यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हेही वाचा: Tollywood Vs Bollywood: 'भाषेचं काय घेऊन बसता, सगळचं...' आलिया बिनधास्त बोलली

Web Title: Bollywood News Amitabh Bachchan Share Don 1978 Movie Share Blockbuster

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top