"बॉलिवूड पार्ट्यांमध्ये खोटेपणाच फार"; नवाजुद्दीनने सांगितलं अलिप्त राहण्याचं कारण | Nawazuddin Siddiqui | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawazuddin Siddiqui

"बॉलिवूड पार्ट्यांमध्ये खोटेपणाच फार"; नवाजुद्दीनने सांगितलं अलिप्त राहण्याचं कारण

बॉलिवूडच्या दमदार अभिनेत्यांमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीचं (Nawazuddin Siddiqui) नाव आवर्जून घेतलं जातं. नवाजुद्दीन बॉलिवूडचा अविभाग्य भाग बनू शकला, परंतु इंडस्ट्रीमधल्या कोणत्याच पार्ट्यांमध्ये तो फारसा कधी दिसला नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नवाजुद्दीनने यामागचं कारण सांगितलं. अशा पार्ट्यांमध्ये 'दिखावेपणा' फार असल्याने तिथं जाणं टाळत असल्याचं नवाजुद्दीनने स्पष्ट केलं. नवाजने बऱ्याच चित्रपटांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये आपल्या दमदार अभिनय कौशल्याचा ठसा उमटवला आहे. बॉलिवूडमध्ये आपलं स्वतंत्र स्थान मिळवल्यानंतरही तो साधेपणानंच राहणं पसंत करतो.

'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन म्हणाला, "मी ज्या पद्धतीचे सिनेमे करतो, तसाच मी खऱ्या आयुष्यात आहे. मी साकारलेल्या भूमिका वास्तववादी असतात. असं म्हणतात ना, एखादी व्यक्ती जितकी लोकल असते, तितकाच तिचा प्रभाव ग्लोबल असतो. तुम्ही तुमच्या मुळांशी एकनिष्ठ राहिलात, तर जगातील प्रत्येक व्यक्ती तुमच्यावर प्रेम करू लागेल."

हेही वाचा: 'तू करतेय ते चुकीचं की बरोबर..'; अल्लू अर्जुनचं समंथासाठी वक्तव्य

बॉलिवूड पार्ट्यांना न जाण्याबाबत तो पुढे म्हणाला, "मी अशाच प्रकारचे सिनेमे करतो आणि माझा स्वभावही तसाच आहे. मी बनावट चित्रपटात काम करत नाही आणि माझी वृत्तीही बनावट नाही. बॉलिवूड पार्ट्यांपासून अलिप्त राहण्याचं कारण म्हणजे मला स्टारडम आणि ग्लॅमरचं जग आवडत नाही. चित्रपटसृष्टीतील कार्यक्रम किंवा पार्ट्यांमध्ये जाण्यापेक्षा मला सामान्य लोकांमध्ये राहायला आवडतं. मला तिथे खूप खोटेपणा दिसतो, जो मला आवडत नाही."

नवाजुद्दीनने त्याच्या 'सीरियस मेन' या चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकनासह अनेक पुरस्कार जिंकले. २०२२ मध्ये तो 'जोगिरा सारा रा रा', 'टिकू वेड्स शेरू', 'अदभूत', 'संगीन' आणि 'हिरोपंती २' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. जोगिरा सारा रा रा आणि टिकू वेड्स शेरूमध्ये तो मुख्य भूमिका साकारणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top