अनुराग कश्यप V/S पायल घोष...केसनं उडवली होती बॉलीवूडची झोप Payal Ghosh had accused Anurag Kashyap allegedly molesting her.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Payal Ghosh had accused Anurag Kashyap allegedly molesting her..Read Inside Story

Bollywood: अनुराग कश्यप V/S पायल घोष...केसनं उडवली होती बॉलीवूडची झोप

Anurag Kashyap: अनुराग कश्यप जेवढा त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत राहिला तेवढाच वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि त्याच्यावर झालेल्या काही खळबळजनक आरोपांमुळे देखील. अनुराग कश्यपवरील अशाच एका आरोपाने संबंध बॉलीवूडला हादरवलं होतं.

पायल घोष या अभिनेत्रीनं अनुराग कश्यपला ट्वीटरवर टॅग करत ट्वीट केलं होतं..ज्यात तिनं लिहिलं होतं,''अनुराग कश्यपने माझ्यासोबत जबरदस्ती केली आहे. नरेंद्र मोदी यांना माझी विनंती आहे की याविरोधात लवकरात लवकर कारवाई करावी आणि संपूर्ण देशाला हे माहिती होईल की सत्य काय आहे. मला माहित आहे की हे उघडपणे बोलणं माझ्या करिअरसाठी तसंच वैयक्तिकरित्या माझ्यासाठी धोक्याचं ठरेल. कृपया मला सहकार्य करा''.(Payal Ghosh had accused Anurag Kashyap allegedly molesting her..Read Inside Story)

हेही वाचा: Ram Gopal Varma: 'होय मी तिचे पाय चाटले...; ट्रोलिंग नंतर राम गोपाल वर्मांचे हैराण करणारे स्पष्टिकरण

पायलच्या या ट्वीटला त्यावेळी 'पंगा क्वीन' कंगना रनौतने रीट्वीट करत #MeToo हॅशटॅग लिहिलं होतं,''प्रत्येक आवाज महत्त्वाचा आहे. अनुराग कश्यपला अटक करा''.

पायल घोषच्या याच ट्वीटला रीट्वीट करत राष्ट्रीय महिला आयोगाच्या त्यावेळच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी देखील पूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. रेखा शर्मा यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं की,''तु मला ncw#nic.in आणि @NCWindia वर अधिक सविस्तरपणे तुझी बाजू सांगू शकतेस. संपूर्ण प्रकरणाला समजून घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल''.

त्यावेळी संपूर्ण प्रकरणावर अनुराग कश्यप काय प्रतिक्रिया देतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.

अनुराग कश्यपने देखील दुसऱ्या दिवशी रात्री १२.३८ मिनिटांनी एक हिंदी भाषेत ट्वीट केलं. त्यानं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं...''मला गप्प करण्याच्या प्रयत्नात इतका वेळ घेतलास. तरीपण ठीक आहे. मला गप्प करता करता इतकं खोटं बोलून गेलीस की स्वतःच्या खोटेपणात दुसऱ्या महिलांना देखील ओढलंस. थोडी तरी मर्यादा पाळा मॅडम. फक्त एवढंच म्हणेन जे देखील आरोप केले आहेत माझ्यावर, ते सगळे खोटे आहेत''.

अनुरागने त्याच्या पुढील ट्वीटमध्ये लिहिलं होतं की,''माझ्यासोबत माझ्या मित्र-परिवाराला आणि बच्चन कुटुंबाला नाहक यात ओढलंस पण यातून काहीच सिद्ध होणार नाही. मॅडम मी दोन लग्न केली,जर तो गुन्हा आहे तर मला मान्य आहे आणि खूप वेळा प्रेमही केलं. हे देखील कबूल करतो मी''.

हेही वाचा: Vidya Balan Video: भर पार्टीत कॅमेऱ्यासमोरच विद्याच्या साडीच्या निऱ्या सुटल्या,पदरानेही दिला दगा...

अनुराग कश्यपने पायल घोषच्या आरोपांवर उत्तर देताना म्हटलं होतं की, ''माझी पहिली पत्नी असो की दुसरी पत्नी किंवा माझी कोणी प्रेमिका असो किंवा ज्यांच्यासोबत मी काम केलं त्या अभिनेत्री असोत,किंवा त्या सगळ्या महिला असोत ज्यांना मी अनेक ठिकाणी भेटलो...हा अशा प्रकारचा घाणेरडा व्यवहार मी कधीच कोणासोबत केला नाही ना कोणी इतर व्यक्तीनं माझ्यासमोर एखाद्या महिलेचा केलेला अपमान मी सहन केला आहे''.

''बाकी जे काही होईल ते पाहूया. तुझ्या व्हिडीओतून काय खोटं,काय खरं स्पष्ट दिसतंय. बाकी खूप सारा आशीर्वाद आणि प्रेम. तुझ्या इंग्रजी भाषेतील ट्वीटचं उत्तर हिंदी भाषेतून दिल्याबद्दल माफी''. त्यावेळी अनुराग कश्यपवर पायल घोषनं केलेल्या आरोपानं सगळं बॉलीवूड मात्र हादरलं होतं.