'होय मी तिचे पाय चाटले...; ट्रोलिंग नंतर राम गोपाल वर्मांचे हैराण करणारे स्पष्टिकरण Ram Gopal Varma | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ram Gopal Varma First Reaction on viral kissing video with south actress ashu reddy, feet massive trolling

Ram Gopal Varma: 'होय मी तिचे पाय चाटले...; ट्रोलिंग नंतर राम गोपाल वर्मांचे हैराण करणारे स्पष्टिकरण

Ram Gopal Varma: प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मांच्या एका व्हिडीओनं गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. राम गोपाल वर्मा गेल्या काही वर्षात अनेक अतरंगी गोष्टी करताना दिसले आहेत पण सध्याच्या या व्हायरल व्हिडीओतून त्यांनी सगळ्याच मर्यादा ओलांडलेल्या दिसत आहेत. (Ram Gopal Varma First Reaction on viral kissing video with south actress ashu reddy, feet massive trolling)

साऊथची अभिनेत्री आशू रेड्डीच्या पायांना,पायांच्या बोटांना राम गोपाल वर्मा सारखा दिग्दर्शक चुंबन घेताना दिसला अन् पाहणाऱ्याला धक्काच बसला. राम गोपाल वर्मांच्या या व्हिडीओवरनं खूप गोंधळ माजला आहे. आपल्या आगामी 'डेंजरस' सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं रामूनं केलेली ही अजब हरकत सगळ्यांनाच खटकली आहे. दिग्दर्शकानं आता आपल्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: Money Laundring Case प्रकरणात आता दोन अभिनेत्री एकमेकींच्या विरोधात, नोराचा जॅकलिनवर मानहानीचा दावा..

आशु रेड्डीच्या पायांना किस केल्यानंतर आता राम गोपाल वर्मा त्यावर स्पष्टिकरण देत सुटले आहेत. अर्थात त्यांचे ते स्पष्टिकरण पटण्यासारखे मुळीच नाही. रामगोपाल वर्मा यांनी अभिनेत्री अप्सरा रानी हिचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये अप्सरा सोफ्यावर आडवी पडलेली दिसत आहे. आणि तिचा पाळीव कुत्रा देखील फोटोत दिसत आहे.

ट्वीटरवर या फोटोला शेअर करत रामगोपाल वर्मांनी लिहिलं आहे-''एक सगळ्यात मोठा डेंजरस मी आहे. खबरदार,जर माझ्या अप्सरा रानीला हात लावला. अशा ठिकाणी चावेनना तुम्ही लोक विचारही करणार नाही''. राम गोपाल वर्मा यांनी एक पोस्टही सोबत शेअर केली आहे.

Ram Gopal Varma First Reaction on viral kissing video with south actress ashu reddy, feet massive trolling

Ram Gopal Varma First Reaction on viral kissing video with south actress ashu reddy, feet massive trolling

रामगोपाल वर्मा यांनी अप्सरा हिचा तिच्या कुत्र्यासोबतचा फोटो शेअर करत सोबत स्वतःचा आशु रेड्डीसोबतचा पाय चाटतानाचा फोटो शेअर करत त्यांचा कोलाज बनवला आहे. आणि लिहिलं आहे-''आशु रेड्डीच्या पायांजवळ बसून ज्या डेंजरस भावना मी फील केल्या त्याच अप्सरा रानीच्या कुत्र्यानं तंतोतंत शिकल्या आहेत''. अप्सरा रानीच्या कुत्र्याचं नाव हॅरी महाराणा आहे.. इन्स्टावर अप्सराचे तिच्या कुत्र्यासोबत अनेक फोटो पहायला मिळतील.

हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?