bollywood pics pm narendra modi watches clips of r madhavan film rocketry the nambi effect reaction
bollywood pics pm narendra modi watches clips of r madhavan film rocketry the nambi effect reaction

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहिली 'रॉकेट्री' चा व्हिडिओ; आर माधवनचं केलं कौतूक  

Published on

मुंबई -  बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता आर माधवन यानं आपल्या आगामी रॉकेट्री चित्रपटाविषय़ीची एक पोस्ट व्हायरल केली आहे. त्याचं काय आहे की, रॉकेट्री - द नाम्बी इफ्केट रॉकेट साइंटिस्ट नाम्बी नारायणन यांच्या आयुष्यावर आधारित एक बायोपिक आता प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याचा प्रोमोही काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याची क्लिप माधवन यानं पंतप्रधान मोदी यांना दाखवली होती. त्यावेळी त्यांनी त्या चित्रपटाबद्दल गौरवोद्गार काढले होते. माधवन याच्या त्या नव्या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. प्रेक्षक तो चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची वाट पाहत आहेत.

सोमवारी माधवन यानं पीएम मोदीजी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्या भेटीचे फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केले होते. नाम्बी नारायणन, आर माधवन आणि मोदीजी हे बरोबर आहेत असे फोटो माधवननं शेअर केले आहेत. त्या फोटोंना सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळाली आहे. प्रेक्षकांनी माधवनचे कौतूक केले आहे. नुकताच रॉकेट्री - द नाम्बी इफ्केट चा ट्रेलर प्रसिध्द झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची अमिताभ बच्चन, प्रियंका चोप्रा, कंगणा राणावत यासारख्या सेलिब्रेटींनी कौतूक केले आहे. त्यांनी माधवन याला त्याच्या या नव्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. 
माधवनने सांगितले की, काही दिवसांपूर्वी मोदीजी यांना त्या चित्रपटाच्या काही क्लिप्स दाखवण्यात आल्या होत्या. त्यावेळी ते प्रभावित झाले होते. त्यांनी कौतूकही केले.

रॉकेट्री द नाम्बी इफ्केट हा चित्रपट रॉकेट साइंटिस्ट नाम्ही नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. आज त्यानं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. माधवन यानं याविषय़ी लिहिलं आहे की, काही दिवसांपूर्वी आदरणीय पंतप्रधान मोदी यांना भेटण्याचा योग आला होता. त्यावेळी त्यांना आमच्या नव्या चित्रपटाच्या क्लिप्स दाखवण्यात आल्या होत्या. त्यांनी नाम्बी यांना मनपूर्वक धन्यवाद दिले होते.

एरोस्पेस इंजिनिअर नाम्बी नारायणन यांच्यावर आधारित हा बायोपिक असणार आहे. त्यांच्यावर दुस-या देशांसाठी हेरगिरी करण्याचा आरोप केला जातो. त्यामुळे त्यांना अटकही केली जाते. 1996 मध्ये त्यांनी सीबीआयनं सगळ्या आरोपांमधून क्लीन चीट दिली होती. तर 1998 मध्ये नारायणनं यांना नॉट गिल्टी असा निर्णय न्यायालयानं दिला होता. 2019 मध्ये त्यांना पद्नमभुषण पुरस्कारानं गौरविण्यात आले होते. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com