esakal | गुजराती प्रश्नाला अनिल कपूर यांचे मराठीतून उत्तर 
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Kapoor

दिलखुलास हसणं, मनमोकळं वागणं, बिनधास्त बोलणं आणि सर्वांना आपलस करून घेणं यासाठी बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांची वेगळी ओळख आहे. त्यांचा हसरा चेहरा त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाची साक्ष पटवून देतात. वयाची 60 ओलांडल्यावरही चेहऱ्यावर दिसणारा उत्साह, आणि ऊर्जा चकित करणारी आहे. हे आजच्या तरुण कलाकार पिढीला आवर्जुन सांगावे लागते.

गुजराती प्रश्नाला अनिल कपूर यांचे मराठीतून उत्तर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - दिलखुलास हसणं, मनमोकळं वागणं, बिनधास्त बोलणं आणि सर्वांना आपलस करून घेणं यासाठी बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांची वेगळी ओळख आहे. त्यांचा हसरा चेहरा त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाची साक्ष पटवून देतात. वयाची 60 ओलांडल्यावरही चेहऱ्यावर दिसणारा उत्साह, आणि ऊर्जा चकित करणारी आहे. हे आजच्या तरुण कलाकार पिढीला आवर्जुन सांगावे लागते. 

प्रख्यात अभिनेता अनिल कपूर यांचे मुंबई आणि मराठी भाषेवरील प्रेम सर्वांना माहिती आहे. त्यांनी आपल्या वेगवेगळ्या मुलाखती, व्हिडीओतुन त्याची प्रचिती करून दिली आहे. असाच एक प्रसंग सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. त्यात अनिल कपुर एका चाहतीने प्रश्न विचारला. पण तो मराठीतून नव्हे तर गुजरातीतून त्या प्रश्नाला उत्तर अनिल यांनी थेट मराठीतून दिले. ते खूप लोकप्रिय झाले आहे. अनेकांनी अनिल कपूर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवादही दिले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्याचे झाले असे की, बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर AK vs AK या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. याच चित्रपटानिमित्त नुकताच अनिल कपूर यांनी सोशल नेटवर्किंगवरुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. #AkVsAk हा हॅशटॅग वापरुन मला प्रश्न विचारा मी उत्तर देईन असं सांगत अनिल यांनी चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिलं.युट्यूबर असणाऱ्या अदिती रावल या तरुणीने अनिल कपूर यांच्या AK vs AK या चित्रपटाचं कौतुक केलं. यामध्ये अनिल कपूर यांनी खूपच छान अभिनय केला आहे. पडद्यावर वावरताना ते अभिनय करत आहेत असं वाटतं नाही, अशा शब्दांमध्ये अदितीने गुजराती आणि इंग्रजी भाषेत अनिल कपूर यांचं कौतुक केलं. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

57 सेकंदांच्या व्हिडीओच्या शेवटी तिने अनिल कपूर यांना मला तुम्हाला भेटून तुमची मुलाखत घेण्याची इच्छा आहे असंही आदीतीने म्हटलं आहे. यापूढे आदिती म्हणाली की, मी अनिल यांना तुम्ही एवढी ऊर्जा कुठून आणता असा प्रश्न अनिल कपूर यांना #AkVsAk हा हॅशटॅग वापरुन विचारला. त्यावर त्यांनी मला उत्तर दिले. त्यांचा स्वभाव, मनमोकळं बोलणं ऐकून फार आनंद वाटला. अनिल कपूर यांनी या ट्विटला उत्तर देताना व्हिडीओमध्ये अदितीने व्यक्त केलेल्या मुलाखत घेण्यासंदर्भातील इच्छेवर भाष्य केलं. मात्र हे उत्तर देताना गुजराती तसेच इंग्रजीमधून बोलणाऱ्या अदितीला मुंबईकर असणाऱ्या अनिल कपूर यांनी मराठीमधून उत्तर दिलं. “तुम्ही मला बोलवा मी कधीही येईन” असं उत्तर अनिल कपूर यांनी या ट्विटला दिलं.

Edited By - Prashant Patil

loading image