सेटवर कसा वागतो सलमान?, खुलासा करत प्रकाश राज म्हणाले,'तो सर्वांनाच आल्या आल्या बोलतो की..'Prakash Raj on salman Khan behaviour on film set | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood: Prakash Raj on salman Khan behaviour on film set .share his experience.

Prakash Raj: सेटवर कसा वागतो सलमान?, खुलासा करत प्रकाश राज म्हणाले,'तो सर्वांनाच आल्या आल्या बोलतो की...'

Prakash Raj:आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असणारे साऊथ सिनेमांचे स्टार प्रकाश राज यांनी सलमान खानसोबत काम करण्याचा अनुभव नुकताच शेअर केला. त्यासोबतच त्यांनी सिनेमाच्या सेटवर सलमान खान कसा वागतो याविषयी देखील त्यांनी सांगितलं आहे. प्रकाश राज यांनी सलमान खान सोबत प्रभुदेवा दिग्दर्शित 'वॉन्टेड' सिनेमात काम केलं आहे. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. आणि यामुळे सलमानच्या सिने-करिअरला देखील चांगलं वळण मिळालं होतं.

प्रकाश राज यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सलमान खानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आणि प्रत्यक्ष आयुष्यात दबंग खान कसा आहे याविषयी देखील प्रकाश राज यांनी अनेक खुलासे केले आहेत. प्रकाश राज नुकतेच आपल्याला झी ५ वरील 'मुखबिर' या ओटीटी सीरिज मध्ये दिसले आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत अभिनेता आदिल हुसैन देखील दिसला.(Bollywood: Prakash Raj on salman Khan behaviour on film set .share his experience.)

हेही वाचा: Avatar 2 Twitter Review: अफाट..अद्भूत..अचाट..'अवतार 2 ' पाहून भारावलं पब्लिक!

प्रकाश राज यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की सलमान खूप खट्याळ आहे. तो स्वतःला एक अभिनेता म्हणून सेटवर कधी समजतच नाही,तर तो तिथे केवळ प्रॅंक करायला आला आहे असंच समजतो. मला तर त्याच्यात एक खट्याळ मुलगाच नेहमी दिसतो,जो कधीची म्हातारा नाही होणार. तो जे बोलतो ते तोंडावर. प्रेम तिथे प्रेम आणि राग तिथे राग...असा त्याच्या नियम. त्याचं क्रिमिनल माइंड नाहीय. मी त्याच्यासोबत दोन सिनेमे केले आणि मला त्याची कंपनी खूप आवडली. तो कुणाला घाबरत नाही.

हेही वाचा: Marthi Movie: 'अवतार'नं केला सोनाली कुलकर्णीच्या 'व्हिक्टोरिया' चा गेम,आपल्याच घरातून मराठी सिनेमा हद्दपार

प्रकाश राज यांनी सलमानच्या सेटवरील वर्तणुकीविषयी खुलासा करताना म्हटलं की,''सलमान सेटवर नेहमी उशिरा येतो आणि आपल्या मनाप्रमाणे काम करतो. त्याला त्याचं मार्केट माहितीय. त्याचा तगडा चाहता वर्ग आहे,हे देखील त्याला उत्तम माहितीय आणि त्यात त्याला आनंद आहे. तो जेव्हा सेटवर येतो तेव्हा बोलतो की आरामात काम करा. चला,मित्रांनो काहीतरी खाऊया...'',असं सहज तो सर्वांशी बोलतो. काही लोक असतात ज्यांना तुम्ही कधीच जज नाही करू शकत, त्यात सलमानचं नाव घ्यावं लागेल.

हेही वाचा: Vaalvi Teaser: परेश मोकाशीचा 'वाळवी' देणार 440 व्होल्टचा झटका; सिनेमाआधी टीझरनंच दिला धक्का...

प्रकाश राज आता लवकरत साऊथच्या दोन सिनेमात काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी आपल्या एका वक्तव्यानं प्रकाश राज यांनी खळबळ उडवून दिली होती. प्रकाश राज म्हणाले होते, त्यांच्या विशिष्ट राजकीय विचारसरणीचा त्यांच्या कामावर परिणाम होत आहे. ते म्हणाले होते,''माझ्यासोबत काही लोकांना काम करायचे नाही. त्यांना कोणी माझ्यासोबत काम न करण्याची तंबी दिलेली नाहीय पण त्यांना वाटतं माझ्यासोबत काम करून काम करण्याचं समाधान त्यांना मिळणार नाही''.