Ram Gopal Varma: राम बाबूच्या गर्लफ्रेंडची लिस्ट काही संपेना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian film director Ram Gopal Varma

Ram Gopal Varma: राम बाबूच्या गर्लफ्रेंडची लिस्ट काही संपेना!

बॉलिवूड असो वा टॉलिवूड प्रत्येक ठिकाणी असा एक नमूना असतोच जो त्याच्या बेताल वक्तव्यामूळे नेहमीच चर्चेत असतो. त्यातलाच एक म्हणजे राम गोपाल वर्मा... नेहमी काही ना काही बोलनं किंवा कुणाशी तरी नावं जोडलं जानं हे काही त्याच्यासाठी नवीन नाही. नुकतच ‘डेंजरस’ चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी त्यांनी एक डेंजरस फंडा वापरला. अभिनेत्रीला फूट मसाज करत तिचे पाय हातात घेऊन किस आणि त्याला चाटतांना तो दिसला. त्याच्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. या व्हिडिओवरून प्रचंड ट्रोलिंग होत आहे .

या व्हिडिओची प्रचंड चर्चा होत आहे. आता राम गोपाल वर्मा या अभिनेत्रींच्या प्रेमात पडतो की काय असा प्रश्न पडला आहे. कारण आतापर्यंत राम गोपाल वर्माने ज्या ज्या अभिनेत्रीबरोबर काम केलेयं त्यांचं नाव त्याच्यांशी जोडलं गेलं आहे. अशाचं काही अभिनेत्रींबद्दल तुम्हाला सांगतो..

उर्मिला मातोंडकर:

उर्मिला मातोंडकर:

उर्मिला मातोंडकर:

रंगीलाच्या शूटिंगदरम्यान राम गोपाल वर्मा उर्मिलाच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की त्याला प्रत्येक चित्रपटात उर्मिलाच पाहिजे होती. एका चित्रपटातून त्यांनी माधुरीला काढून उर्मिला घेतले. उर्मिलाने राम गोपाल वर्मा बरोबर १३ चित्रपट केले आहे. इतकेच नव्हे तर त्याने त्याच्या ऑफिसमधील एका खोलीचे नावही उर्मिला नावावर ठेवले आहे. उर्मिला मातोंडकर बरोबर प्रकरण राम गोपाल वर्माची बायकोला समजले तेव्हा तिने उर्मिलाच्या कानाखालीही मारली होती. या घटनेनंतर प्रकरण खूप गाजलं होतं आणि राम गोपाल वर्माने धक्कादायक पाऊल उचललं होते. त्याने पत्नीलाच घटस्फोट दिला होता.

निशा कोठारी

निशा कोठारी

निशा कोठारी

निशा जेम्स, शिवा, डार्लिंग, राम गोपाल वर्मा की आग आणि डरना जरूरी है यासह अनेक आरजीव्ही चित्रपटांमध्ये दिसली होती. त्या नंतर दोघांच्या देखील अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या. चार वर्षे ते एकत्र होते. आरजीव्हीच म्युझिक चित्रपट फ्लॉप झाला. त्यानंतर निशाला अनेक फ्लॉप चित्रपटांचा सामना करावा लागला आणि २०११ नंतर ती बॉलिवूडमध्ये दिसली नाही.

हेही वाचा: Bigg Boss16: टीना दत्ताला मोठा झटका! बिग बॉसने दाखवला बाहेरचा रस्ता?

अंतरा माळी

अंतरा माळी

अंतरा माळी

अंतरा एक अभिनेत्री होती जी आरजीव्हीशी जोडली गेली होती. अंतराने राम गोपाल वर्माच्या 'रोड' चित्रपटातातून चर्चेत आली .नंतर या दोघांच्या रिलेशनशिपच्या अफवा पसरत होत्या. तिने राम गोपाल वर्माच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले पण नंतर तिचा "मिस्टर या मिस" हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तिने बॉलिवूड सोडले.

जिया खान

जिया खान

जिया खान

दिवंगत जिया खान देखील राम गोपाल वर्माला डेट करत असल्याची अफवा होती, तिच्या करिअरची सुरुवात दिग्दर्शकाच्या निशब्द या चित्रपटातून केली होती. रिपोर्ट्सनुसार, आरजीव्हीने तिच्यासाठी महागडे घर विकत घेतले होते, परंतु अमिताभ बच्चन यांच्याबद्दल जियाच्या काही अफवा पसरल्यानंतर ते वेगळे झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

हेही वाचा: Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

मधु शालिनी

मधु शालिनी

मधु शालिनी

राम गोपाल वर्माची मधु शालिनीशी ओळख पुरी जगन्नाध यांच्या मार्फत झाली होती. मधुने राम गोपाल वर्माच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमध्ये करिअर सुरू करण्यापूर्वी मधुने अनेक तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले होते. अनेक वेळा या दोघांचं रिलेशनशिपच्या चर्चा होऊ लागली.