Ratan Tata: रतन टाटा यांचा बायोपिक येणार... दाक्षिणात्य दिग्दर्शक करणार निर्मिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratan Tata

Ratan Tata: रतन टाटा यांचा बायोपिक येणार... दाक्षिणात्य दिग्दर्शक करणार निर्मिती

आपल्या देशातील दिग्गज उद्योगपती आणि आयकॉन रतन टाटा यांच्यावर लवकरच बायोपिक बनणार आहे. रतन टाटा यांच्या जीवनातील काही चर्चित नसलेल्या घटनांही या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुधा कोंगारा करणार आहेत. बॉलिवूडमध्ये एका मागोमाग एक बायोपिकची निर्मिती होताना दिसत आहे. प्रसिद्ध खेळाडू, अभिनेते, राजकीय नेते यांच्यानंतर आता उद्योगपती यांच्या आयुष्यावर चित्रपट निर्मिती केली जाणार आहे.

2023 च्या अखेरीस चित्रपटाचं शूटिंग सुरू होऊ शकतं. चित्रपटाचे संपूर्ण रिसर्च कार्य पूर्ण झालं आहे. दिग्दर्शिका सुधा याबद्दल खूप उत्सुकही आहेत. रतन टाटा यांच्यासारख्या प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वावर चित्रपट बनवण्याचं त्याचं स्वप्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....


समोर आलेल्या माहितीनुसार निर्मात्यांना या चित्रपटाद्वारे रतन टाटा यांच्या जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी दाखविण्यात येणार आहेत, ज्याबद्दल फार लोकांना फारशी माहिती नाही. त्याचप्रमाणे निर्मात्यांनी चित्रपटाच्या स्क्रिप्टवर कामही सुरू केले आहे.

रिपोर्टनुसार, रतन टाटा यांच्या बायोपिकमध्ये रतन टाटा यांच्या भूमिकेसाठी अभिनेता अभिषेक बच्चन किंवा साऊथ सुपरस्टार सूर्या यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

हेही वाचा: Big Boss 16: Big Boss 16 मध्ये पुन्हा 'MeToo' ! अर्चना गौतम आणि सौंदर्या शर्मा यांची तूफान फटकेबाजी

सुधा कोंगारा याच्याबद्दल बोलायंच झालं तर त्यांनी आंध्र अंदगाडू चित्रपटामधून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी सूरराई पोट्रू या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. आता त्या सूरराई पोट्रूच्या हिंदी रिमेकची निर्मिती करत आहेत.

तर रतन टाटा हे टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आहेत. 1991 पासून टाटा समूहाची सेवा केल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. नुकतेच रतन टाटा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न संस्थेकडून 'सेवारत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय देशातील सर्वात मोठे उद्योगपती रतन टाटा यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहेत.