Richa Chadha: भारतीय सैन्याची खिल्ली उडवणारी रिचा पाकिस्तानची बाजू घेतानाही दिसली होती, पहा Viral Video

रिचा चढ्ढा अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ट्रोल झाली आहे. आता तर आर्मी विरोधात बोलल्यामुळे तिच्या 'फुकरे ३' सिनेमाच्या बॉयकॉटची मागणी होतेय.
Richa Chadha throwback video viral after pakistan ban and artists after galwan tweet boycott fukrey 3 also trend
Richa Chadha throwback video viral after pakistan ban and artists after galwan tweet boycott fukrey 3 also trend Google

Richa Chadha: बॉलीवूड अभिनेत्री रिचा चड्ढा सध्या भरपूर चर्चेत पहायला मिळते. गलवान प्रकरणात तिनं केलेल्या ट्वीटमुळे खळबळ माजली अन् लोकांनी तिच्यावर निशाणा साधला. एकीकडे रिचाला ट्रोल केलं जात असताना बातमी आली की तिच्याविरोधात आता पोलिसात तक्रारही दाखल झाली आहे.

यादरम्यान रिचा चड्ढाचे काही जुने व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर कुणीतरी ते व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये रिचा पाकिस्तानशी संबंधित एका मुद्दयावर बोलताना दिसत आहे.

अभिनेत्रीच्या या व्हिडीओजना शेअर करण्यात आल्यानंतर आता नेटकरी म्हणत आहेत की रिचा खूप आधीपासनं देशाच्या विरोधात आणि पाकिस्तानची बाजू घेत बोलताना दिसली आहे.(Richa Chadha throwback video viral after pakistan ban and artists after galwan tweet boycott fukrey 3 also trend)

Richa Chadha throwback video viral after pakistan ban and artists after galwan tweet boycott fukrey 3 also trend
Kantara: रश्मिकासोबत काम करण्यास 'कांतारा'च्या ऋषभ शेट्टीचा नकार?;व्हायरल व्हिडीओत स्पष्टच बोलताना दिसला

सोशल मीडियावर रिचा चढ्ढाचा २०१९ मधला एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत पत्रकार रिचाला विचारताना दिसत आहे की, एकीकडे जिथे पाकिस्तान आपल्या सिनेमांवर बंदी आणत आहे,तिथे दुसरीकडे आपले कलाकार तिथे जाऊन परफॉर्म करत आहेत.

यावर रिचा म्हणाली होती, ''माझा या मुद्दयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकदम वेगळा आहे. मला वाटत कलाकाराला फक्त प्रेमाची,शांतीची भाषा माहित आहे. मला वाटतं कलाकारांवर बंदी आणली जाते कारण ते कदाचित दोन देशांत मैत्री घडवून आणू शकतात''.

आणखी एका दुसऱ्या कार्यक्रमात रिचा बोलताना दिसत आहे की, पाकिस्तानी अभिनेत्याला आपल्या देशातून पळवून लावून,त्याच्यावर बंदी आणून आपण याची हमी देऊ शकतो का की आपल्या देशावर हल्ला होणार नाही? याची गॅरंटी कोणी देईल का?

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Richa Chadha throwback video viral after pakistan ban and artists after galwan tweet boycott fukrey 3 also trend
Bhediya Twitter Review: वरुण धवनचा 'भेडिया' पाहून पब्लिक कन्फ्यूज; प्रतिक्रिया देत म्हणू लागले...

रिचाचे फक्त व्हिडीओज नाहीत तर ट्वीटरवर Boycott Fukrey 3 देखील ट्रेंड होताना दिसत आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की रिचा चढ्ढाला माफी मागायला हवी. रिचा चड्ढा विषयी अनेक मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. तिला खूप ट्रोल केलं जात आहे. रिचा चड्ढाच्या आर्मी विरोधातील ट्वीटला अनेक लोकांनी तिच्या लग्नाशी देखील जोडलं आहे. यासोबतच सोशल मीडियावरील काही नेटकऱ्यांनी तर तिच्याविषयी लिहिताना खालची पातळी गाठल्याचं दिसून आलं.

हे सगळं सुरु झालं रिचाच्या एका ट्वीटवरनं. तिनं सैन्याचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या एका वक्तव्यावर भाष्य केलं होतं. सैन्य अधिकारी आपल्या वक्त्व्यात म्हणाले होते, ''पाकव्याप्त काश्मिरला पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी भारतीय सैन्याला फक्त सरकारच्या आदेशाची प्रतिक्षा आहे''. ज्यावर रिचा म्हणाली होती,''गलवान नमस्ते करत आहे''.

यानंतर अनेक लोकांनी रिचावर शाब्दिक प्रहार करायला सुरुवात केली. भारतीय सैन्याची खिल्ली उडवल्याचा आरोप देखील तिच्यावर करण्यात आला. एकीकडे जिथे अक्षय कुमारने ट्वीटरवर अभिनेत्रीची यावरनं शाळा घेतली,तिकडे दुसरीकडे दिग्दर्शक अशोक पंडित यांनी रिचा विरोधाच पोलिसांत थेट तक्रार दाखल केली.

प्रकरण तापतंय म्हटल्यावर मग रिचानं देखील माफी मागत म्हटलं की,''भारतीय सैन्याचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हताच मुळी, पण माझ्या ज्या तीन शब्दांवरनं वाद उकरुन काढला जातोय,त्यावरनं कोणाचं मन दुखावलं असेल तर यासाठी मी माफी मागते. आणि माझा कोणता हेतू नसताना देखील सैन्यातील माझ्या भावासारख्या सैनिकांच्या मनात कोणती नैराश्याची भावना माझ्यामुळे आली असेल तर यासाठी मला खेद आहे. माझे आजोबा सैन्यात होते. ते सैन्यात लेफ्टिनेंट कर्नल होते. १९६५ च्या भारत-चीन युद्धा दरम्यान लढताना त्यांच्या पायात गोळी घुसली होती''.

Richa Chadha throwback video viral after pakistan ban and artists after galwan tweet boycott fukrey 3 also trend
Bigg Boss Marathi 4: 'आता वैयक्तिक खेळ सुरु झाला...',तेजस्विनीला असं का म्हणाले किरण माने?

रिचा पुढे म्हणाली, ''सैन्याची नशा माझ्या रक्तात आहे. जेव्हा एक मुलगा देशाची सेवा करताना,त्याचं रक्षण करताना शहीद होतो तेव्हा पूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होतो. हा एक भावनिक मुद्दा आहे''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com