'तानाजी'बाबत सैफ अली खाननेच घेतला आक्षेप, म्हणाला...

Saif Ali Khan
Saif Ali Khan

मुंबई : तानाजी हा ऐतिहासिक चित्रपट नसून, या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे, असा आक्षेप नोंदवत अभिनेता सैफ अली खानने आपण देशातील धर्मनिरपेक्ष वातावरण हरवत चाललो आहे असे म्हटले आहे.

तानाजी या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून, चित्रपटाची कमाई जवळपास 200 कोटींच्या घरात गेली आहे. या चित्रपटात उदयभान राठोडची भूमिका साकारणाऱ्या सैफच्या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तानाजीच्या भूमिकेत असलेल्या अजय देवगननेही चांगली भूमिका केली आहे. या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याची पूर्वीपासूनच चर्चा सुरु आहे. आता एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने विविध विषयांवर मत व्यक्त केले आहे.

सैफ म्हणाला, की या चित्रपटाबाबत एक अभिनेता म्हणून काहीच समस्या नाही, पण एक व्यक्ती म्हणून नक्कीच आहे. काही गोष्टींमुळे मी मत मांडत नाही. कदाचित पुढच्या वेळी मांडेन. पण ही भूमिका अत्यंत सुंदर असल्याने ती करण्यासाठी मी उत्साही होतो. पण जेव्हा लोक म्हणतात की हाच इतिहास आहे. तर मला तसं वाटत नाही. इतिहास काय आहे हे मला नीट माहिती आहे. हेच लोकांना आवडत आणि म्हणूनच ही संकल्पना चालली. पण मला वास्तवात अशा इंडस्ट्रीचा भाग होण्यास आवडेल जे एखादी भूमिका घेतील. जे लोकांना खरा इतिहास सांगतील. त्याच्यासोबत छेडछाड करणार नाही. पण लोक म्हणतात हेच चालतं. ही एक नवी संकल्पना आहे जी हिट ठरत आहे. पण ही गंभीर बाब आहे. लोकशाहीसाठी इंडस्ट्रीतील कोणालाही मी भांडताना पाहत नाही. पण विद्यार्थी लढत आहेत. बॉलिवूडमधील कोणीही भूमिका घेत नाही. कदाचित त्यांचा चित्रपटावर बंदी येण्याची भीती असते.

देशातील सध्याची परिस्थिती पहून आपण धर्मनिरपेक्षतेपासून दूर चाललो आहोत असे वाटते. त्याच्यासाठी कोणी लढतानाही मला दिसत नाही. अभिनेता या नात्याने कोणतीही भूमिका घेणं माझ्यासाठी योग्य नाही, कारण यामुळे माझ्या चित्रपटांवर बंदी येऊ शकते आणि त्याच्या कमाईवर प्रभाव पडू शकतो. बॉलिवूमधील लोकांना आपला व्यवसाय आणि कुटुंब संकटापासून दूर ठेवायचं असल्यानेच राजकीय प्रतिक्रिया देत नाहीत, असे स्पष्ट मत सैफने मांडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com