Shahrukh Khan: उमराहनंतर शाहरुख आता वैष्णोदेवीच्या दर्शनाला...व्हिडिओ व्हायरल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shah Rukh Khan

Shahrukh Khan: उमराहनंतर शाहरुख आता वैष्णोदेवीच्या दर्शनाला...व्हिडिओ व्हायरल!

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टिझर सेमार आलाय आणि आज त्याच्या चित्रपटाच पहिलं गाणंही रिलीज होणार आहे. मात्र या आधी तो 'डंकी' या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी सौदी अरेबियात होता. जिथं त्यांने उमराह करण्यासाठी मक्का येथं पोहचला होता. त्यावेळी त्याचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल झाले होते. आता शाहरुखने माता वैष्णोदेवीच्या दरबारात हजेरी लावली आहे. तेथे देवीचं दर्शन त्याने घेतलं. त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Shahrukh च्या 'पठाण' वर रिलीज आधीच बहिष्काराची मागणी; CM योगी कनेक्शन?

व्हिडिओमध्ये शाहरुखने काळे कपडे घातले दिसत आहे. शाहरुख खानचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गजबजलेल्या ठिकाणी शाहरुख खानला पाहून घाबरू नये किंवा कोणालाही त्यांची ओळख पटू नये म्हणून त्याने चेहरा लपवला आहे.त्याने डोळ्यांवर गडद रंगाचा चष्मा लावला आहे. हा व्हिडिओ काल रात्री उशिराचा असल्याचं सांगण्यात येत आहे.

अलीकडे त्याच्या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेंण्ड सुरू होता, हा विरोध थांबवण्यासाठी तो देवीच्या मंदिरात गेल्याचं बोलंल जात आहे. याआधी त्यांने २ डिसेंबरला मक्कालाही भेट दिली होती. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो वैष्णोदेवीच्या मंदिरातला आहे. त्यामूळे या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

हेही वाचा: Aamir Khan Viral Photo : 'तुझा ढोंगीपणा बंद कर', आमिरला नेटकऱ्यांनी झापलं..

नूकतचं आमीरने आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या नव्या कार्यालयाचे पूजन केली. यावेळी त्याच्यासोबत त्याची एक्स वाईफ किरण रावही होती. आमीरने एकीकडे पूजा केलीय आणि दुसरीकडे पिके मधून हिंदू धर्मावर ताशेरे ओढले आहेत, त्यामुळे त्याला आता चांगलेच ट्रोल केले जात आहे. त्यामूळं चित्रपट फ्लॉप होत आहेत म्हणूनच तो हिंदू असल्याचं भासवत आहे. असं म्हणतं त्यालाही अनेकांनी त्यांना ट्रोल केले.