Shahrukh Khan: शेवटी बादशाहचं तो! 'पठाण'चं ट्रेलर झळकलं बुर्ज खलिफावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahrukh Khan

Shahrukh Khan: शेवटी बादशाहचं तो! 'पठाण'चं ट्रेलर झळकलं बुर्ज खलिफावर

Pathaan On Burj Khalifa: शाहरुखला बादशाह म्हटंल जातं. त्याची क्रेझ केवळ भारतातच नव्हे तर सगळ्या देशात आहे. एकीकडे भारतात शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'पठाण'वरुन वाद सुरु आहेत. तर जगभरात या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. जिथे सर्व प्रि बुकिंग तिकिटं जर्मनीत विकली गेली.आता या चित्रपटाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला आहे.

हेही वाचा: Pathaan Trailer: राडा केला पण दणकाचं दिला! काही मिनिटातचं मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार.. ट्विटरवर नेटकरी सुसाट

दुबईतील जगातील सर्वात उंच इमारतीवर किंग खानच्या चित्रपटाचा ट्रेलर शाहरुखच्या उपस्थितीत दाखविण्यात आला. त्याचे व्हिडिओ आणि सर्व फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि हे पाहिल्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांमध्ये खुप जल्लोषाचं वातावरण आहे.

हेही वाचा: Miss Universe 2022 R Bonney Gabriel: दिविताचा स्वप्नभंग! अमेरिकेची आर बॉनीच्या डोक्यावर 'मिस युनिव्हर्सचा मुकूट'

यशराज फिल्म्सने दुबईमध्ये शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजशी संबंधित एक पोस्ट देखील शेअर केली आहे. त्यात शाहरुख खान दिसत असून बुर्ज खलिफावरील 'पठाण'चा ट्रेलर पाहत आहे.

त्याचवेळी हे सर्व दृश्य पाहून चाहत्यांनाही आपला आनंद आवरता आला नाही. इतकचं नाही तर शाहरुख खानचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो तिथल्या स्टेडियममध्ये त्याच्या पठाण चित्रपटातला डायलॉग बोलत आहे. आणि त्याला ऐकण्याची त्याच्या चाहत्याची क्रेझ स्पष्टपणे दिसून येते.

हेही वाचा: Shehnaaz Gill: पंजाबची शेरनी शहनाज गिल 'त्याला' इतकी घाबरली की रडूचं लागली..

यावरुन चाहत्यांमध्ये त्याची किती क्रेझ आहे हे स्पष्ट दिसतं आहे. भारतात या चित्रपटातील गाण्यावरुन वाद होत आहे. चित्रपटाला बॉयकॉट करण्याचा ट्रेंण्ड सुरु आहे मात्र शाहरुखचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शाहरुखला बादशहा का म्हणतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही.

चाहत्यांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. एका चाहत्याने लिहिले - भारताची शान शाहरुख खान. एकाने लिहिले- शाहरुख बादशाह आहे. एक चाहता म्हणाला - ही 25 तारीख कधी येईल. मला पहायचं आहे. 25 जानेवारीला शाहरुख, दिपिका, जॉनचा पठाण प्रदर्शित होणार आहे.