Shehnaaz Gill: पंजाबची शेरनी शहनाज गिल 'त्याला' इतकी घाबरली की रडूचं लागली.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shehnaaz Gill

Shehnaaz Gill: पंजाबची शेरनी शहनाज गिल 'त्याला' इतकी घाबरली की रडूचं लागली..

बिग बॉस फेम शहनाज गिल हिला कोणी ओळखत नाही असं होणारच नाही. तिच्या नखरेल शैलीमुळे ती लाखो चाहत्याच्या हृदयावर राज्य करते. शहनाजला खरी ओळख बिग बॉस सीझन 13 शो मध्ये मिळाली. तिच्या क्युट स्टाइलने तिने सगळ्यांना खूप हसवले.

सध्या शहनाजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून चाहत्यांना पुन्हा एकदा बिग बॉसमधल्या शहनाज गिलची आठवण झाली आहे.

हेही वाचा: Adil-Rakhi Sawant: राखीचा ड्रामा काही संपेना! आता आदिलनचं सोडलं मौन म्हणाला,..

शहनाजने स्वतः तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. वास्तविक, हा व्हिडिओ शहनाज गिलच्या नवीन म्युझिक अल्बम 'घनी सयानी'च्या शूटिंगदरम्यानचा आहे ज्यामध्ये तिला वाळवंटात उंटावर बसून एक सीन शूट करायचा होता. या गाण्यात शहनाज गिलसोबत एमटीव्ही हसल 2.0 विजेता एमसी स्क्वेअर देखील होता.

हेही वाचा: Lalit Modiची प्रकृती बिघडली अन् नेटकऱ्यांना सुष्मिताची चिंता लागली! भावाने दिली प्रतिक्रिया..

मात्र उंटावर बसल्यानंतर शहनाज इतकी घाबरते की ती घाबरून 'अम्मा-अम्मा' ओरडू लागते, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ती कशा प्रकारे घाबरली आहे. काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत शहनाज गिलने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जान है तो जहाँ है, मला भीती वाटत होती.'

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांना पुन्हा एकदा जुनी शहनाज गिलची आठवण झाली. अभिनेत्रीच्या या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'हाय… ही अम्मा ऐकून मला जुने दिवस आठवले. आज सिड तिथे असता तर तो पोट धरून हसला असता', तर दुसऱ्या युजरने लिहिले की, 'हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला हसू आवरता येत नाही.'

हेही वाचा: Bigg Boss 16: भारती-हर्षचा बिगबॉसच्या घरात दंगा! सलमानला बनवलं मुलाचा बेबी सीटर..

तिसर्‍याने लिहिले, 'शहनाजच्या किंकाळ्या ऐकून उंटालाही वाटत असेल की भाऊ, मी अजून काही केले नाही.' मध्यंतरी तरी दुबईमध्ये शहनाज चित्ताच्या पिल्लाला पाहून घाबरली होती.

हेही वाचा: Shiv Thakare: बिग बॉसची ट्रॉफी शिवचीचं! अमृता फडणवीसांनी दिली शिव ठाकरेला शाबासकी

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शहनाज गिल लवकरच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट यावर्षी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.