Shehnaaz Gill: बाबो! पुरस्कार शहनाजला पण दिला पहिल्या प्रेमाला.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shehnaaz Gill

Shehnaaz Gill: बाबो! पुरस्कार शहनाजला पण दिला पहिल्या प्रेमाला..

स्वत:ला पंजाब की कतरिना कैफ म्हणण्यापासून ते स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्यापर्यत शहनाज गिलचा प्रवास हा खरंच प्रेरणादायी आहे.तिने काही कालावधीतच तिच्या साध्यापणाने सर्वांची मने जिंकली. बिग बॉस 13' पासून शहनाज गिल लोकप्रिय झाली.

नुकतीच शहनाज गिल दुबईत फिल्मफेअर मिडल ईस्ट अचिव्हर्स नाईट 2022 मध्ये हजेरी लावली. यावेळी जेव्हा तिला पुरस्कार देण्यात आला, तेव्हा शहनाजने सिद्धार्थ शुक्लाचं नाव घेत हा पुरस्कार दिवंगत सिद्धार्थला समर्पित केला.तिने तिच्या फॅमिलाला मित्रांना याच क्रेडिट न देता तिच्या प्रियकराला हा पुरस्कार समर्पित केला. त्याचे आभार मानले.

हेही वाचा: Shehnaaz Gill चा बोल्ड अंदाज; स्टायलिश लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

यावेळी ती म्हणाली, 'तू मेरा है और तू मेरा ही रहेगा' हा पुरस्कार मिळाल्यानंतर शहनाजने तिचा प्रसिद्ध डायलॉग बोलंला. यावेळी ती म्हणाली, मला एका व्यक्तीचे आभार मानायचेत धन्यवाद, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल.  माझ्यात इतकी गुंतवणूक केल्याबद्दल तुझ्यामूळे की आज मी इथपर्यंत पोहोचली आहे. सिद्धार्थ शुक्ला, हे तुझ्यासाठी आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर शहनाज गिलने केलेले भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहनाज म्हणते, 'मी माझे कुटुंब, मित्र आणि टीम अजिबात समर्पित करणार नाही कारण ही माझी मेहनत आहे.' यानंतर, 'तू मेरा है और तू मेरा ही रहेगा' हा पुरस्कार पाहिल्यानंतर शहनाज तिचा प्रसिद्ध संवाद बोलते. मला एका व्यक्तीचे आभार मानायचे आहेत. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. त्यांनी माझ्यात इतकी गुंतवणूक केली की आज मी इथपर्यंत पोहोचले आहे. सिद्धार्थ शुक्ला, हे तुमच्यासाठी आहे.

हेही वाचा: Shehnaaz Gill: तुझ्यासाठी कायपण! 16 तासांचा विमान प्रवास फक्त शहनाजला भेटण्यासाठी..

जेव्हापासून शहनाजने तिचा पुरस्कार सिद्धार्थ शुक्लाला समर्पित केला, तेव्हापासून 'सिदनाज'चे चाहते खूप आनंदी झाले आहेत. ती प्रसिद्ध झाल्यानंतरही सिद्धार्थला विसरलेली नाही याचा तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. सोशल मीडियावर तिचं जोरदार कौतुक होत आहे

शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची 'बिग बॉस 13' मध्ये भेट झाली होती. दोघेही खूप चांगले मित्र होते, शहनाज सिद्धार्थच्या प्रेमात पडली होती आणि तिने ते उघडपणे व्यक्त केलं होतं. त्यांचे चाहते त्यांच्या जोडिला प्रेमाने सिदनाज म्हणत. सप्टेंबर २०२१ मध्ये सिद्धार्थ शुक्ला यांचे निधन झाले. त्याच्या अचानक जाण्यानं तिच्यासह तिच्या चाहत्यांनाही धक्काचं बसला. शहनाज ही सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसणार आहे