Viral News: मिकाच्या जिव्हारी लागला तो प्रश्न, पत्रकाराला केली शिवीगाळ|Bollywood Singer Mika Singh abuses | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mika Singh

Viral News: मिकाच्या जिव्हारी लागला तो प्रश्न, पत्रकाराला केली शिवीगाळ

Bollywood News: बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक मिका सिंग (Mika Singh) हा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसतो. सोशल मीडियावरही तो त्याच्या वादामुळे नेटकऱ्यांच्या टीकेचा धनी झालेला आहे. गायकीमुळे नव्हे तर वादग्रस्त (Entertainment News) स्वभावाचा फटका अनेकदा मिका सिंगला बसला आहे. (Viral news) बॉलीवूडमधील आणखी एक सेलिब्रेटी राखी सावंतसोबत त्यानं भर पार्टीमध्ये गैरवर्तन केल्याचे दिसून आले होते. त्यावरुन तो बराचकाळ नेटकऱ्यांच्या टीकेला सामोर जावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा मिका चर्चेत आला आहे तो पत्रकाराला शिवीगाळ केल्यामुळे. पत्रकारानं त्याला विचारलेला प्रश्न जिव्हारी लागला. त्यामुळे त्यानं चक्क त्या पत्रकारालाच शिवीगाळ केल्याची बातमी व्हायरल झाली आहे. त्याच्या स्वयंवर (Swayamvar Show) नावाच्या शो चं प्रमोशन सुरु आहे.

मिका सिंगला गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणामुळे नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. बॉलीवूडची क्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि मिका सिंग यांच्यातील वादही बराच काळ सोशल मीडीयावर चर्चेत होता. मिकाचा स्वयंवर नावाचा शो आता सुरु होणार असून त्याच्या प्रमोशनसाठी मिका पत्रकार परिषद घेतो आहे. मात्र हा शो सुरु होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे. त्या शो च्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये त्याला एका पत्रकारानं राखी सावंत या शो मध्ये सहभागी होणार आहे का, असा प्रश्न विचारला होता. हा प्रश्न ऐकताच मिका राग अनावर झाला होता. त्यानं थेट त्या पत्रकारावरच राग काढत त्याला शिवीगाळ केल्याचे दिसून आले आहे. बराचकाळ त्याची चर्चा सुरु होती.

हेही वाचा: Viral Video : नववधूनं भर लग्नमंडपात असं काही केलं की सगळेजण पाहतच राहिले

पत्रकाराच्या त्या प्रश्नानंतर मिकाचा मुड खराब झाला. त्यानंतर त्यानं आपल्याला पुढील प्रश्नांची उत्तरे देण्यात काहीच रस नसल्याचे सांगितले. त्यावेळी तिथं उपस्थित असणाऱ्या पत्रकारांनी सांगितले की, मिका त्यावेळी काही बोलला नाही. मात्र परिषदेनंतर त्यानं त्या पत्रकाराला शिवीगाळ केल्याचे दिसून आले. मिका त्याच्या शो मधून नव्या नवरीच्या शोधात आहे. त्या शोच्या प्रमोशनसाठी दिल्लीमध्ये एका खास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मिकाला जो प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यानं उत्तर देणं टाळलं होतं.