'यापुढे रियॅलिटी शो मध्ये भाग नाहीच', सोनु निगमनं सांगितलं कारण|Bollywood Singer Sonu Nigam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonu Nigam

'यापुढे रियॅलिटी शो मध्ये भाग नाहीच', सोनु निगमनं सांगितलं कारण

Bollywood News: बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सोनु निगम (Bollywood Singer Sonu Nigam) हा जसा त्याच्या व्हर्सेटाईल गायकीसाठी ओळखला जातो तसा तो त्याच्या परखड स्वभावासाठी देखील प्रसिद्ध आहे. त्याचा चाहतावर्ग जगभरात (Entertainment News) आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या सोनुनं टीव्ही (Tv Entertainment News) मनोरंजन वाहिनीवरील कार्यक्रमांबाबत टीका केली आहे. आपल्याला काहीही झालं तरी त्या रियॅलिटी शो मध्ये जायचचं नाही. आणि (Bollywood Movies) परिक्षक होण्यात तर आपल्याला काडीचाही रस नाही. याचं कारण सोनुनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. अशाप्रकारच्या कार्यक्रमांचा चाहता मोठा असला तरी त्या शोमध्ये काय चालतं हे यावेळी सोनुनं सांगितलं आहे. यापूर्वी देखील सोनुनं अशाप्रकारचे स्टेटमेंट करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

इंडियन आयडॉल सारख्या रियॅलिटी शो मध्ये सोनु निगम दिसला होता. त्याला नेटकऱ्यांची पसंतीही मिळाली होती. मात्र यापुढे मी अशा शो चा भाग होणार नाही. मला या साऱ्याचा प्रचंड उबग आला आहे. मला पैसे नको आहेत. आणि पैसे कमविण्यासाठी मी फारसा उत्सुकही नाही. त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम मला नको आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोनु निगम हा कोणत्याही टीव्ही मनोरंजनाशी जोडला गेलेला नाही. त्यानं रियॅलिटी शो वरुन एक महत्वाचे स्टेटमेंट केले आहे. त्यामध्ये आता आपण यानंतर रियॅलिटी शो मध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगत नेटकऱ्यांना धक्का दिला आहे. सध्या सोनु निगम हा बंगाली सिगिंग रियॅलिटी शोच्या तिसऱ्या सीझनचा एक महत्वाचा भाग आहे. त्यामध्ये त्यानं जजची भूमिका पार पाडली आहे. यामध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानु आणि ख्यातनाम शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती हे देखील जजच्या भूमिकेत आहे.

हेही वाचा: Jhund Movie Review: प्रवाहाबाहेरील टीमची व्यवस्थेला 'कीक'

निर्माते आम्हाला विनाकारण एखाद्या स्पर्धकाचं कौतूक करायला सांगतात. अशावेळी आपल्याला ते जमत नाही. माझ्या स्वभावाचा तो भागही नाही. म्हणून मला हे शो नको आहेत. आपल्याला पैसे कमविण्याचा काही सोस नाही. निर्माते काही सांगणार आणि आपण ते गुपचूप करणं हे काही बरोबर नाही. त्यामुळे मी यापुढे अशा कार्यक्रमांना नकार देणार असल्याचे सोनुनं सांगितलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सोनुनं रियॅलिटी शो चे विदारक चित्र लोकांसमोर आणले आहे.

Web Title: Bollywood Singer Sonu Nigam Not Participated Music Reality Show Viral News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top