खलनायकाच्या दिग्दर्शकाची '36 फार्महाऊस' मधून ओटीटीवर एंट्री | Bollywood star director Subhash Ghai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

36 farmhouse
खलनायकाच्या दिग्दर्शकाची '36 फार्महाऊस' मधून ओटीटीवर एंट्री

खलनायकाच्या दिग्दर्शकाची '36 फार्महाऊस' मधून ओटीटीवर एंट्री

बॉलीवूडमध्ये (Bollywood) आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीनं प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलेला दिग्दर्शक म्हणून सुभाष घई (Director Subhash Ghai) यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. बॉलीवूडमधील (Bollywood Movie) सर्वाधिक प्रभावी दिग्दर्शकांपैकी एक म्हणून घई यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ बॉलीवूडला वेगवेगळ्या प्रकारचे दर्जेदार चित्रपट दिले आहे. त्यामध्ये खलनायक, ताल, यादे, परदेश, राम लखन, यासारख्या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल.

कोरोनानं मनोरंजनाची (Covid Entertainment) व्याख्या पूर्णपणे बदलून टाकली आहे. दोन वर्षानंतर अनेकांनी ओटीटीवर व्हिडिओ कंटेट (Video Content) आणण्यासाठी प्रयत्न केले आहे. आता सर्वाधिक चाहता ओटीटीवरील आहे. त्यांना वेबसीरिज आणि मुव्ही पाहण्यामध्ये रस आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून मनोरंजन क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन कोरोनानं बदलून टाकला आहे. आपण मनोरंजन क्षेत्राकडे नजर टाकल्यास अनेक दिग्दर्शकांनी ओटीटीवर पदार्पण केल्याचे दिसून आले आहे. आता त्यामध्ये प्रख्यात दिग्दर्शक सुभाष घई यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. हिंदी चित्रपटसृष्टीत चार दशकांहून अधिक काळ घालवणारे ज्येष्ठ चित्रपट निर्माते सुभाष घई यांनीही OTT कडे वळले आहे आणि त्यांचा पहिला चित्रपट 36 फार्महाऊस ZEE5 वर प्रदर्शित होत आहे. हा एक कमी बजेटचा विनोदी-थ्रिलर चित्रपट आहे ज्यामध्ये संजय मिश्रा, विजय राज, अमोल पराशर, बरखा सिंग, अश्विनी काळसेकर आणि फ्लोरा सैनी मुख्य भूमिकेत आहेत. मंगळवारी एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.

हेही वाचा: Viral Video: कुत्र्याला घाबरुन 'जंगलाचा राजा' गेला पळून

36 फार्महाऊस हे मुळात खुनाचे रहस्य आहे. समाजातील आर्थिक विषमता या चित्रपटातून व्यंगात्मक पद्धतीने मांडण्यात आली आहे. काही गरजेपोटी चोरी करतात तर काही लोभापोटी चोरी करतात या संदेशावर कथेचा फोकस आहे. या चित्रपटाचे लेखन सुभाष घई यांनीच केले असून संगीतही त्यांनीच दिले आहे. 36 फार्महाऊसचे दिग्दर्शन राम रमेश शर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट २१ जानेवारीला Zee5 वर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: Video: 'लता दीदींचं' ते गाणं स्पर्धकानं गायल्यावर 'बादशहा' रडला!

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top