Video: 'लता दीदींचं' ते गाणं स्पर्धकानं गायल्यावर 'बादशहा' रडला! |Tv entertainment rapper Badshah Shilpa Shetty shocked listen to Lata Mangeshkar song | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Badshah Sentimental
Video: 'लता दीदींचं' ते गाणं स्पर्धकानं गायल्यावर 'बादशहा' रडला!

Video: 'लता दीदींचं' ते गाणं स्पर्धकानं गायल्यावर 'बादशहा' रडला!

टीव्ही क्षेत्रामध्ये (Tv Entertainment) सध्या जे रियॅलिटी शो (Reality show) आहेत त्यांनी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळवली आहे. कोरोनाच्या काळात या शोजनं प्रेक्षकांना मोठा मानसिक आधार दिला होता. त्याचे कारण त्यावेळी मनोरंजन (Entertainment) इंडस्ट्री पूर्णपणे ठप्प होती. अशावेळी अनेकांनी रिपीट टेलिकास्ट ब्रॉडकास्ट करुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. आता पुन्हा त्या शोजनं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. त्यापैकी एक शो इंडियाज गॉट टँलेटचा (Indias got new talent New season) नवा सीझन 15 जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्यानिमित्तानं एक व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रख्यात गायक बादशहाला (Rapper Badshah) रडू कोसळलंय. त्याचं कारण आपण जाणून घेणार आहोत.

त्या शो मध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकानं गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे एक गाणे गायले. ते ऐकून बादशहाला रडू आलं. तो कमालीचा भावूक झाल्याचं यावेळी दिसून आलं आहे. इंडियाज गॉट टँलेटच्या (New season of indias got new talent) नव्या सीझनमध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी, बादशाह आणि किरण खेर हे जजच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता अर्जुन बिजलानीनं (Arjun Bijlani) हा शो होस्ट केला आहे. सध्या या व्हिडिओचे प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यातून त्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यातील एका प्रोमोमध्ये बादशहानं त्या स्पर्धकाचे गाणे ऐकले आणि त्याला रडू आलं. लता दीदींच 'तू जहां जहां चलेगा' हे गाणं त्या स्पर्धकानं गायलं आणि त्याला काय बोलावं हे कळेना.

हेही वाचा: Viral Video: कुत्र्याला घाबरुन 'जंगलाचा राजा' गेला पळून

इशिता विश्वकर्मा (Eshita Vishwakarma) नावाच्या स्पर्धकानं हे गाणं गायलं आहे. तिच्या गायकीचं परिक्षकांनी तोंड भरून कौतूक केलं आहे. ते गाणं ऐकल्यावर केवळ बादशहाच नाहीतर शिल्पा शेट्टीही भावूक झाल्याचे दिसून आले आहे. शिल्पानं स्टेजवर जावून इशिताचं अभिनंदन केलं. तिला खूप खूप शुभेच्छाही दिल्या. मनोज मुंतशिर देखील या स्पर्धेचा एक महत्वाचा भाग आहे. शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) देखील या शोचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडिय़ावर शेयर करताना दिसते.

हेही वाचा: ओमिक्रॉनला जाळून मारण्याचा चिनी प्रयोग? VIDEO VIRAL

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top