Bollywood Stars Web Series In 2023: नव्या वर्षात या कलाकारांच्या वेब सिरिज गाजवणार OTT.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Stars actresses Web Series on OTT In 2023 kajol sara ali khan kareena kapoor sonakshi sinha urmila matondkar

Bollywood Stars Web Series In 2023: नव्या वर्षात या कलाकारांच्या वेब सिरिज गाजवणार OTT..

Bollywood Stars Web Series In 2023: ओटीटी प्लॅटफॉर्मची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे 2022 मध्ये, हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. माधुरी दीक्षित ते अजय देवगण आणि सुनील शेट्टी सारख्या स्टार्सनी OTT वर पदार्पण केले आणि प्रेक्षकांची पसंती मिळवली. आता 2022 ही वर्ष सारून लवकरच 2023 हे वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे याही वर्षात अनेक बॉलीवुड कलाकार OTT वर झळकण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये अभिनेत्री काजोल पासून ते सारा आली खान पर्यंत अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: राखी सावंतचा बॉयफ्रेंड आदिल बिग बॉसच्या घरात.. केलं मराठीत प्रपोज..

काजोल - द गुड वाईफ

रेणुका शहाणे दिग्दर्शित 'त्रिभंगा' या चित्रपटातून ओटीटीमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री काजोल 2023 मध्ये अमेरिकन कोर्टरूम ड्रामा मालिका 'द गुड वाईफ' या नवीन वर्षात हिंदी रिमेकसह वेब सीरिजमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. सुपरण वर्मा या सिरिजचे दिग्दर्शन करत आहे. या सिरिजमध्ये काजोलशिवाय कुब्बरा सैत, शीबा चड्ढा, आमिर अली दिसणार आहेत.

हेही वाचा: Bollywood Celebs On OTT: बॉलिवूडने ओळख दिली पण ओटीटीमुळे गाजले हे कलाकार..

करीना कपूर खान - द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स

करीना कपूर 'Devotion of Suspect X' द्वारे OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. हा शो जपानी लेखक केगो हिगाशिनो यांच्या 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' या कादंबरीवर आधारित आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित, या सिरिज मध्ये करीना कपूर खान, विजय वर्मा आणि जयदीप अहलावत प्रमुख भूमिकेत आहेत आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

उर्मिला मातोंडकर - तिवारी

रंगीला अभिनेत्री उर्मिला मातोंडकर तिवारी या वेब सीरिजद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. आई आणि मुलीच्या भावनिक नात्यावर आधारित ही थ्रिलर मालिका आहे. या सिरिजची कथा एका छोट्या शहराच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या सिरिजचे दिग्दर्शन सौरभ वर्मा करत आहेत. आत्तापर्यंत, ही सिरिज कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येईल याविषयी प्रॉडक्शन टीमकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सोनाक्षी सिन्हा - दहाड

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा देखील रीमा कागती दिग्दर्शित 'दहाड' या वेब सिरीजद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. ही मालिका Amazon Prime Video वर स्ट्रीम होईल. या सिरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा पोलीस अधिकारी अंजली भट्टची भूमिका साकारत आहे. या सिरिज मध्ये सोनाक्षी सिन्हा व्यतिरिक्त विजय वर्मा, गुलशन देवैया आणि सोहम शाह यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

सारा अली खान - ए वतन मेरे वतन

मोठ्या पडद्यावर फारसे यश मिळवू न शकलेली सारा अली खान अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या 'ए वतन मेरे वतन' या वेब सीरिजद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण करत आहे. करण जोहर या सिरिजची निर्मिती करत आहे. कन्नन अय्यर दिग्दर्शित ही मालिका 1942 च्या स्वातंत्र्य चळवळीवर आधारित आहे. या मालिकेत सारा अली खान उषा मेहताची भूमिका साकारत आहे जी स्वातंत्र्य लढ्यात गुप्त रेडिओ ऑपरेटर होती. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.