
टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये (Tv entertainment news) आपल्या हटक्या आणि बोल्ड अंदाजानं अभिनेत्री उर्फीनं मोठी लोकप्रियता मिळवली आहे. फॅशन जगतात रोज तिच्या कपड्यांवर प्रयोग करणारी उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. उर्फी तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाइलसाठी ओळखली जाते.
ती तिच्या लूकने सोशल मीडियावर दहशत निर्माण करते.तिच्या या फॅशनच्या ज्ञानबद्दल तर आपल्या सर्वांनाच माहित आहे,मात्र आता उर्फी सेक्सविषयी तिचं ज्ञान वाटतांना दिसतेय. इतकच नाही तर तिनं आता शारीरिक संबंधांवर आपले मत मांडले असून त्याचे फायदे सांगितले आहेत.
उर्फीने एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे.यामध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया एका महिलेची मुलाखत घेत आहे.ती सेक्सशुअल एनर्जीबद्दल बोलत आहे.स्त्री म्हणते, सेक्सशुअल एनर्जी खूप शक्तिशाली आहे. महिलेच्या या गोष्टींना उत्तर देताना उर्फीने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ही महिला म्हणते आहे की जर एखाद्या महिलेने सेक्स केले तर तिचे वय लवकर वाढते. ती व्हॉट्सअॅप विद्यापीठातून पदवीधर आहे. हो तुमचे बरोबर आहे.
त्यानतंर उर्फीनं इस्टांग्रामच्या स्टोरीला गुगल सर्च इंजिनचा स्क्रीनशॉट आहे, ज्यामध्ये या विषयावर मानसशास्त्रज्ञांचे काय म्हणणे आहे हे सांगितले आहे. या स्क्रीनशॉटनुसार मानसशास्त्रज्ञ सांगतिले की, नियमितपणे सेक्स केल्याने तुम्ही तुमच्या वयापेक्षा सातपट लहान दिसता. लैंगिक संभोग एंडोर्फिन शरीरात तयार होतो, जे मूड वाढवणारी रसायने आहेत जी तुम्हाला चांगली झोप घेण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. सेक्समुळे रक्ताभिसरण वाढते आणि आपली त्वचा तरुण दिसते.
तिच्या फॅशनमुळे तिने लाखों चाहते कमावले आहेत. पण तितकेच तिच्यावर टीका करणारेही आहेत. आता तिच्या या नवीन ज्ञानाबद्दल सोशल मिडियावर चर्चा रंगली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.