Urfi Javed: उर्फीला नेटकरी म्हणाले, ‘काही नाही मिळालं तर मच्छरदाणीच’... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed

Urfi Javed: उर्फीला नेटकरी म्हणाले, ‘काही नाही मिळालं तर मच्छरदाणीच’...

विचित्र फॅशन आणि उर्फी जावेद असं समीकरणचं बनलं आहे. उर्फी कुठेही दिसली की पापाराझी तिला कॅमेऱ्यात कैद करतात. उर्फि या विचित्र फॅशनवरुन नेहमीच ट्रोल होत असते. पण उर्फी ट्रोलिंगला इग्नोर करते आणि फॅशनमध्ये एक पाऊल पुढे जाऊन वेगवेगळ्या फॅशन ट्राय करते. 

उर्फी नुकतीच तिच्या मित्रांच्या रूफटॉप पार्टीत दिसली. तिच्यासोबत तिच्या बहिणी उरुसा जावेद आणि अस्फी जावेदही होते. उर्फीच्या या नाइट पार्टीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात ती मित्रांशी मस्ती करतांना दिसत आहे. नेहमी सारखंच ती यावेळी हि बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.उर्फी जावेद पार्टीत नेटचा ड्रेस घातला होता. कलरफुल ब्रा आणि ब्लॅक लॉट्स सोबत स्टाइल केली. केसांची हाई पोनीटेल घातली होती.

तिच्या या लूकला पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने तिला ‘मच्छ दानी’ घालून आल्याचं म्हटलं तर दुसऱ्याने लिहिले, ‘नेट मध्ये गुंडाळलेली उर्फी.तर काहींनी नेहमीप्रमाणेच तिला नॉर्मल कपडे विकत घेण्याचा सल्ला दिला आहे.

उर्फी नेहमीच तिच्या फॅशनमुळे वादात अडकते. नुकतच तिच नवं गाणं ‘हाय हाय ये मजबूरी’ रिलिज झालंय. ज्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. मात्र या गाण्यावरुन बराच वाद देखिल झाला.तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 25 वर्षीय उर्फी पहिल्यांदा 2016 च्या टीव्ही शो 'बडे भैया की दुल्हनिया'मध्ये दिसली होती, त्यानंतर 'मेरी दुर्गा', 'बेपनाह' आणि 'पंच बीट सीझन 2' मध्ये दिसली होती. याशिवाय उर्फी 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'कसौटी जिंदगी की' मध्येही दिसली होती.