Vikram Gokhale: 'गोखले माझे काका नाहीत', सखी गोखले संतापली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vikram Gokhale
Sakhi Gokhale

Vikram Gokhale: 'गोखले माझे काका नाहीत', सखी गोखले संतापली...

आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, विक्रम गोखले यांच्या निधनानंतर फिल्म इंडस्ट्रीतुन त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

त्यांचे कधी न पाहिलेले फोटो आणि त्याच्या आठवणींना, त्याच्या सोबतचे किस्से शेअर करत त्यांना श्रद्धांजली देण्यात येत आहे. विक्रम गोखले यांच्याशी संबंधित जुन्या गोष्टी, फोटो त्याच्याबाबतचे अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यातच काही चुकीच्या आणि खोट्या गोष्टी बातम्यासमोर आल्या आहे.

हेही वाचा: Vikram Gokhale: “गोखले साहेबांनी संकर्षणचं सक्रमणचं करुन टाकलं” संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट चर्चेत

ते झालं असं की, विकिपीडियावर विक्रम गोखले हे अभिनेत्री सखी गोखलेचे काका असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामूळे सोशल मिडियावर सखी आणि विक्रम गोखले यांच्याबद्दल अनेक पोस्ट व्हायरल होत होत्या. मात्र आता सखीने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात मार्फत तिने चुकीची माहिती पसरवणा-यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

दरम्यान सखीने इस्टांग्रामच्या स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती म्हणाली, "अभिनेते विक्रम गोखले हे एक उत्कृष्ट अभिनेता होते. लहानपणापासून त्यांचं काम आणि त्यांची पडद्यावरची जादू मी पाहिली आहे. त्यांचे जाणे ही अत्यंत दुःखद बाब आहे. पण विक्रम काका आणि माझे वडिल हे भाऊ नव्हते"

हेही वाचा: काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

पुढे ती म्हणते, "विक्रम काकांच्या कुटुंबांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. फक्त दोन कुटुंबामध्ये मैत्रीपुर्ण नाते होते इतकच.. इंटरनेटवरील प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.. विकिपीडिया संपादित करण्यासाठी कोणालाही प्रवेश आहे! विकिपीडियाचा वापर करत तुम्ही तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडत असाल तर ती तुमची चुकी आहे..विक्रम गोखले यांचा माझ्याशी काही संबंध आहे की नाही, मी त्यांच्याबाबत काही पोस्ट करायचे की नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. विक्रम काका गेल्यानंतर त्यांच्याबाबत मी काहीच पोस्ट शेअर केली नाही. याबाबतही मला मॅसेज आले आहेत. शिवाय काहींनी संतापही व्यक्त केला आहे. माझ राग करण्याआधी यामागे खरे कारण काय आहे हे शोधा,". सखी ही दिवंगत अभिनेते मोहन गोखले आणि शुभांगी गोखले यांची कन्या आहे. तिने सांगितल्याप्रमाणे तिचा आणि दिवंगत विक्रम गोखले यांचा काहीही संबंध नाही. हे मात्र खरे आहे.

हेही वाचा: Vikram Gokhale: 'तुम्ही कायम होताच आणि असालच’,शशांकची भावुक पोस्ट