Bollywod vs Tollywood: एका चित्रपटासाठी कोण किती पैसे घेतो?

बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा संघर्ष पेटल्यानंतर त्यांच्या कलाकृतीवरुन मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
Bollywod vs Tollywood
Bollywod vs Tollywoodesakal

Bollywood Vs South: बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा संघर्ष पेटल्यानंतर त्यांच्या कलाकृतीवरुन मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही (Entertainment News) दिवसांपासून मनोरंजन विश्वातील परिस्थिती ही चिंताजनक आहे. ज्या अभिनेत्यांच्या नावावर चित्रपटांचा व्यवसाय हा शंभर कोटींच्या वर जात होता आता त्याच चित्रपट आणि अभिनेत्यांना प्रेक्षकांना चित्रपट (Bollywood News) पाहण्यासाठी आवाहन करावे लागत आहे. बॉलीवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांना हा धक्का बसला आहे. येत्या काळात आणखी काही अभिनेत्यांना बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

* बॉलीवूड का होतंय बॉयकॉट....

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड Vs टॉलीवूड असा वाद सुरु झाला आहे. त्यामध्ये आता आमिर खानला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. त्याच्या लाल सिंग चढ्ढावर तर बहिष्कार घालण्याची मागणी केली गेली. त्याचा मोठा फटका आमिरच्या लाल सिंग चढ्ढाला बसला. बॉलीवूड अभिनेते आणि त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांधून केलेली वक्तव्यं याचा परिणाम त्यांच्या चित्रपटावर होत असल्याचे समीक्षकांचे म्हणणे आहे. दोन वर्षांपासून बॉलीवूडच्या प्रेक्षकांना प्रेक्षकवर्ग मिळत नसल्याचे दिसून आले आहे.

अल्लु अर्जुनच्या पुष्पापासून जी सुरुवात झाली ती आताच्या विक्रम पर्यत पाहायला मिळते. वयाची 60 ओलांडलेल्या कमल हासन यांच्या विक्रमनं तीनशे कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला. त्याला बॉलीवूडच्या प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. येत्या काळात देखील बॉलीवूडच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची मागणी नेटकऱ्यांनी करण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला आहे. एकुणच त्याच त्या कथा, आणि अभिनेते यांचा कंटाळा नेटकऱ्यांना आल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसून आले आहे. दुसरीकडे बॉलीवूडच्या अभिनेते त्यांच्या चित्रपटांतून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारे चित्रपट घेण्यात पुढाकार घेतात असेही सांगितले जाते.

Bollywod vs Tollywood
Laal Singh Chaddha: 'मैंने कहा था एक दिन मैं हसूंगा तुम रोओगे!' चतूरच्या मीम्सचा कहर

* कोणता सेलिब्रेटी किती पैसे घेतो....

बॉलीवूडचा असो किंवा टॉलीवूडचा काही सेलिब्रेटी आपल्या मानधनाबाबत अजिबातच तडजोड करत नसल्याचे दिसून आले आहे. टॉलीवूडच्या कलाकारांचे मानधन प्रचंड आहे. त्यांच्या चित्रपटांची रेंज आणि कलाकारांचे मानधन यातील फरक अवाक करणारा आहे. बॉलीवूडमध्ये खान अभिनेते आणि अक्षय हे त्या चित्रपटामध्ये भागीदारी घेऊन आपलं मानधन वसूल करत असल्याचे दिसून आले आहे. आयएमडीबी आणि इतर मीडिया सोर्सेसमधून मिळाल्या माहितीनुसार कोणते अभिनेते किती मानधन घेतात हे आपण जाणून घेणार आहोत.

आमिर खान - चित्रपटाचा एकुण जो व्यवसाय होईल त्याच्यातील 70 ते 80 टक्के

सलमान खान - 100 ते 150 कोटी

शाहरुख खान - 100 कोटी

अक्षय कुमार - 70 ते 110 कोटी

अजय देवगण - 60 ते 120 कोटी

ऋतिक रोशन - 75 ते 100 कोटी

थलापकती विजय - 100 ते 150 कोटी

प्रभास - 100 ते 200 कोटी

रजनीकांत - 60 ते 150 कोटी

अल्लु अर्जुन - 60 ते 125 कोटी

Bollywod vs Tollywood
House of the Dragon Review: 'गेम ऑफ थ्रोन्स' शेर तर 'हाऊस ऑफ ड्रॅगन....'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com